आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आणीबाणीच्या पराभवाने खचलेल्या इंदिरा फावल्‍या वेळात विणायच्या स्वेटर, पाहा Family ALBUM

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी - Divya Marathi
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे आज जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त आज आम्ही इंदिरा गांधी यांच्याबाबत भाष्य करणार आहोत.

 

इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी अलाहाबाद येथे झाला. तत्कालीन काँग्रेसचे नेते पंडित जवाहरलाल नेहरू हे देशात सर्वात लोकप्रिय नेते होते. त्यांचीच कन्या इंदिरा या सर्व काँग्रसजनात इंदू या नावाने प्रसिद्ध होत्या. याच इंदिरा गांधी पुढे 1966 साली देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. यानंतर काही वर्षात म्हणजे 1969 साली त्यांनी देशातील सर्व बॅंकांचे राष्ट्रीयीकरण केले. 1971 साली पाकिस्तानला धडा शिकवत पूर्व पाकिस्तानला (आताचा बांगलादेश) वेगळे राष्ट्र निर्माण केले.

 

1972 साली देशात भीषण दुष्काळ पडला. यामुळे देशातील परिस्थिती बदलू लागली. यामुळे विरोधकांनी इंदिरांना घेरण्याचा मनसुबा रचला. या व इतर अनेक कारणांनी इंदिरांनी अखेर 1975 साली आणीबाणी जाहीर केली. या घटनेने देश ढवळून निघाला. इंदिरा गांधी व काँग्रेसच्या विरोधात देशभर वातावरण तयार झाले. लेखक, विचारवंत, पत्रकार, उद्योगपती व सामान्य जनता इंदिरांच्या हा हुकुमशाही निर्णयाच्या विरोधात गेले. त्यामुळे इंदिरांनी दोन-अडीच वर्षांनी आणीबाणी उठवली खरी पण 1977-78 साली झालेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत इंदिरा काँग्रेसचा दारूण पराभव झाला.

 

आणीबाणीनंतर झालेल्‍या निवडणूकीन जनता पक्षाचे सरकार आले. इंदिराचे विरोधक मुरारजी देसाई पंतप्रधान झाले. या काळात इंदिरा गांधी राजकीय विजनवासात गेल्या. इंदिरांनी या दरम्यानचा आपला काळ आत्‍मपरीक्षणात खर्ची घातला. या काळात त्‍या पूर्ण आध्‍यात्‍मिक झाल्‍या होत्‍या. इंदिरा गांधी यावेळी दररोज सकाळी एक तास योगासने करत. आई आनंदमयी यांच्‍या उपदेशाचे रेकॉर्डिंगही त्‍या ऐकत असत. दिवसभरात घरी आलेल्‍या लोकांच्‍या भेटी घेऊन मिळालेल्‍या फावल्‍या वेळात त्‍या घरातील सदस्‍यांसाठी स्‍वेटरही विणत असत. रात्री झोपण्‍यापूर्वी आध्‍यात्‍मिक पुस्‍तकांचे त्‍या वाचन करत.

 

आज 19 नोव्‍हेंबर हा इंदिरा गांधी यांचा जन्‍मदिवस. यानिमित्‍ताने आम्ही या संग्रहात घेऊन आलो आहोत, इंदिरा गांधी यांच्‍याशी संबंधित काही दुर्मिळ बाबी व फोटो.

 

पुढील स्‍लाईड्सद्वारे वाचा, इंदिरा गांधी यांच्‍याशी संबंधित खास प्रसंग व पाहा अत्‍यंत दुमिळ फोटो..

बातम्या आणखी आहेत...