आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरण; मॅजिस्ट्रेटसमोर इंद्राणीची साक्ष नोंदविण्याचे सत्र न्यायालयाचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भायखळा तुरुंगात २३ जून राेजी मंजुळा शेटे या महिला कैद्याचा मृत्यू झाल्यानंतर महिला कैद्यांनी इंद्राणी मुखर्जीच्या चिथावणीवरून गाेंधळ घातल्याचा पाेलिसांचा दावा अाहे. त्यामुळे या प्रकरणी इंद्राणीसह २०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. मात्र या प्रकरणी मंगळवारी न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी इंद्राणीलाच पाेलिसांकडून तुरुंगात मारहाण करण्यात अाल्याचा अाराेप करण्यात अाला. तसेच लैंगिक अत्याचाराची धमकीही देण्यात अाल्याचा अाराेप इंद्राणीच्या वकिलांनी केला अाहे.  भायखळा तुरुंगातील मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणी मॅजिस्ट्रेटसमोर इंद्राणीची साक्ष नोंदवा असे आदेश सत्र न्यायालयाने दिले आहेत. 

पाेलिसांच्या मारहाणीत इंद्राणीच्या शरीरावर व डाेक्यात जखमा झाल्याचा दावाही तिच्या वकिलांनी केला अाहे.  सीबीअायच्या विशेष न्यायालयात अर्ज दाखल करून इंद्राणीला सुरक्षा देण्याची मागणीही त्यांनी केली अाहे. त्याला मंजुरी देत न्यायालयाने इंद्राणीला बुधवारी हजर करण्याचे अादेश दिले अाहेत.
  
२३ जून राेजी कैदी मंजुळाचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला हाेता. मात्र पाेलिसांच्या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याचा अाराेप इतर कैद्यांनी केला हाेता. शवविच्छेदन अहवालातही मंजुळाच्या डाेक्यात जखमा झाल्याचे स्पष्ट झाले हाेते. 
 
हेही वाचा
बातम्या आणखी आहेत...