आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरुंग अधिकाऱ्यांविरुद्ध इंद्राणीची फिर्याद, वैद्यकीय अहवालातही मारहाण झाल्याचे स्पष्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जीने गुरुवारी भायखळा तुरुंगातील अधिकाऱ्यांविरुद्ध मारझोड केल्याची फिर्याद पोलिसांत दाखल केली. वैद्यकीय अहवालातही इंद्राणीला मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, राज्य महिला आयोगाने  कैद्याच्या मृत्यूची स्वत:हून दखल घेत तुरुंग प्रशासनाला समन्स बजावले आहे.  
 
४४ वर्षीय इंद्राणीसह अन्य २०० महिला कैद्यांविरुद्ध भायखळ्याच्या महिला तुरुंगात दंगल केल्याचा गुन्हा बुधवारी दाखल केला होता. विशेष सीबीआय न्यायालयाने इंद्राणीला वैद्यकीय तपासणीनंतर तक्रारीची परवानगी दिली होती. नागपाडा पोलिसांंत तिने ही फिर्याद दिली.

बलात्काराची धमकी   
मंजू शेट्येच्या मृत्यूमुळे संतप्त महिला कैद्यांच्या आंदोलनात सहभागी झाल्याने मला भायखळा तुरुंगातील अधिकाऱ्यांनी मारझोड व बलात्काराची धमकी दिली, अशी इंद्राणीची तक्रार आहे.

हेही वाचा...मंजुळा शेट्टेच्या गुप्तांगावर जखमा नाहीत; भायखळा तुरुंग प्रशासनाने कोर्टात केला दावा

दरम्यान, इंद्राणीने भायखळा तुरुंग प्रशासनाविरोधात नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. काल (बुधवारी) सीबीआयच्या कोर्टात इंद्राणीची साक्ष नोंदवण्यात आली होती. तुरुंग प्रशासनाच्या आदेशानुसार तिला बेदम मारहाण करण्‍यात आल्याचे तिने कोर्टात सांगितले. त्यानंतर कोर्टाने तिची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश दिले होते.

काय आहे मेडिकल रिपोर्टमध्ये...
- न्यूज एजन्सीनुसार, मुंबईतील जेजे हॉस्पिटलच्या मेडिकल ऑफिसरने दिलेली माहिती अशी की, इंद्राणीद्वारा भायखळा तुरुंग प्रशासनावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये सत्यता आहे. तुरुंगात पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप इंद्राणीने केला होते. इंद्राणीच्या डोक्यावर तसेच शरीरावर जखमांचे व्रण आहेत.
- इंद्राणीचा मेडिकल रिपोर्ट कोर्टात सादर करण्यात आला आहे.
- राज्य महिला आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तुरुंगातील महिला कैद्यांची पाहाणी केली होती. डीआयजी (जेल) स्वाती साठे यांनी आयोगासमोर हजर व्हावे लागले होते.

इंद्राणीने नेमके केले काय
- पोलिसांच्या तपासात लक्षात आले की इंद्राणी मुखर्जीने महिला कैद्यांना भडकविले आणि लहान मुलाचा ढाल म्हणुन वापर करण्यास सांगितले. कशा पध्दतीने आंदोलन करायचे हे देखील इंद्राणीने या महिला कैद्यांना सांगितले.
- इंद्राणीप्रमाणेच आणखी 200 महिला कैद्यांवर सुरक्षारक्षकांना मारहाण केल्याचा आणि हिंसक आंदोलन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- भायखळा येथील तुरुंगात महिला कैद्यांना आपल्या 6 वर्षापर्यंत वयाच्या मुलांना सोबत ठेवण्याची परवानगी आहे.

महिला कैदी का करत होत्या आंदोलन
- मंजुळा शेट्ये या कैदी महिलेच्या मृत्यूनंतर शनिवारी आणि रविवारी महिला कैद्यांनी आंदोलन केले. यावेळी झालेल्या हिंसाचारात अनेक जण जखमी झाले.
- जेल अक्षीक्षकाने मंजुळा शेट्येला थोबाडीत मारली होती. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप महिला कैद्यांनी केला आहे. शेट्ये हिच्यावर अंडी चोरल्याचा आरोप होता.
- पोस्टमॉर्टेम अहवालातून खुलासा झाला की, मंजुळा शेट्येच्या डोक्यावर अनेक जखमा झाल्या होत्या, शिवाय अंतर्गत जखमाही झाल्या होता.
- अहवालानंतर भायखळा जेलच्या अधीक्षक मनीषा पोखरकर आणि 5 गार्ड्सविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
कोण आहेत इंद्राणी मुखर्जी
- 2002 मध्ये पीटर मुखर्जी आणि इंद्राणी यांचे लग्न झाले. पीटर हे स्टार इंडियाचे सीईओ होते. इंद्राणी ही आईएनएक्स मीडियाची सीईओ होती.
- शीना ही इंद्राणीला पहिल्या लग्नापासून झालेली मुलगी होती. संजीव खन्ना हा इंद्राणीचा दुसरा नवरा होता. पीटरशी लग्न करण्यापूर्वी इंद्राणी आणि संजीव यांचा घटस्फोट झाला होता. इंद्राणी ही शीना आपली लहान बहिण असल्याचे सांगत होती.

पुढील स्लाइडवर वाचा... कसे उघड झाले शीना बोरा खूनप्रकरण?
बातम्या आणखी आहेत...