आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indrani Mukherjee Threaten Sheena And Mikhail Through Email.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंद्राणीने शिना-मिखाईलला दिली होती धमकी, त्याला शिनाने दिले होते प्रत्युत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिना बोरा हायप्रोफाईल मर्डर केसमध्ये दररोज नाट्यमय घडामोडी घडत असून अधिक गोपनिय माहिती उघडकीस येत आहे. पोलिसांनी इंद्राणीचा खासगी लॅपटॉप जप्त केला आहे. त्यातून माहिती मिळाली आहे, की इंद्राणीने शिना आणि मिखाईलला धमकीचे तीन मेल पाठविले होते. माझे ऐकले नाही तर पॉकेटमनी बंद करेन आणि मालकी हक्कांमधून वगळेल अशी धमकी दिली होती. त्याला मिखाईलने उत्तर दिले नाही. पण शिनाने चांगलाच समाचार घेतला होता. पीटर मुखर्जीसमोर एक्स्पोज करण्याची धमकी शिनाने इंद्राणीला दिली होती.
8 मार्च 2012 रोजी इंद्राणीने धमकीचा पहिला मेल शिनाला पाठवला होता. त्यानंतर तो मिखाईललाही फॉरवर्ड केला होता. तुम्ही जर जास्त स्मार्टनेस दाखवला तर मी माझ्या मालकी हक्कांमधून तुम्हाला वगळेल अशी धमकी दिली होती. इंद्राणी शिना आणि मिखाईलला प्रत्येक महिन्याला प्रत्येकी 40 हजार रुपये पाठवत होती. माझे ऐकले नाही तर पॉकेटमनी बंद करेन असेही ती या मेलमध्ये म्हटली होती.
त्यानंतर 4 मे आणि 7 जुलै 2012 रोजी पुन्हा धमकीचे दोन मेल शिना आणि मिखाईलला पाठविले होते. इंद्राणी, संजीव खन्ना आणि श्यामवर राय यांनी 24 एप्रिल 2012 रोजी इंद्राणीची गळा दाबून हत्या केली. त्याच्या दुसऱ्या दिवशी रायगड जिल्ह्यात मृतदेह जाळण्यात आला. शिनाला ठार मारल्यानंतरही इंद्राणीने दोन मेल का पाठविले याची माहिती अद्याप मिळालेली नाही. कदाचित पोलिसांनी पकडले तर तपास दिशाहिन करण्यासाठी इंद्राणीने असे केले असावे.
इंद्राणीने पाठविलेल्या मेल्सना मिखाईलने उत्तर दिले नाही. पॉकेटमनी थांबवेल अशी त्याला भीती होती. सध्या तो बेरोजगार असून त्याच्यावर गुवाहाटी येथील आजीआजोबांची जबाबदारीही होती. त्याने जर इंद्राणीच्या विरोधात पवित्रा घेतला असताना तर त्याच्यासमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले असते.
पण शिनाने इंद्राणीच्या मेल्सना उत्तर दिले होते. पीटरसमोर तुला एक्स्पोज करेल, अशी धमकी दिली होती. यावर सूत्रांनी सांगितले आहे, की शिना इंद्राणीला कशी एक्स्पोज करणार होती याची माहिती मिळालेली नाही. इंद्राणीने पीटरला सांगितले होते, की शिना आणि मिखाईल माझी भावंडे आहेत. या मागची खरी माहिती पीटरला देण्याचा शिनाचा विचार असावा.
पुढील स्लाईडवर वाचा... पीटरने मोठमोठ्या रकमा इंद्राणीच्या नावे केल्या होत्या, त्यातील काही रकमा इंद्राणीने संजीव खन्नाला पाठविल्या होत्या...