आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंद्राणी मुखर्जीने पीटरला लिहिले पत्र- मला बोलू नकोस, तुझा डबाही शेअर करू नकोस!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इंद्राणी आणि पीटर मुखर्जी वेगवेगळ्या तुरुंगात आहेत, तसेच घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहेत. तरीही दोघा पती-पत्नीतील वाद शमलेला नाही. नुकतेच इंद्राणीने पीटरला पत्र लिहिले आहे. 'मला बोलू नकोस' हेच इंद्राणीने पत्रात लिहिले आहे. याशिवाय तो (पीटर) सार्वजनिक जागी माझ्याकडे दुर्लक्ष करतो, पण खासगी क्षणांत मात्र डबाही शेअर करतो.
 
दोन वर्षांपासून वेगवेगळ्या तुरुंगात
इंद्राणी आणि पीटर यांना ऑगस्ट तसेच नोव्हेंबर 2015 मध्ये अटक झाली होती. त्यांच्यावर मुलीच्या - शीना बोराच्या खुनाचा आरोप आहे. या दोन वर्षांत त्यांना वेगवेगळ्या तुरुंगांत ठेवण्यात आले होते. इंद्राणीला भायखळा, तर पीटरला आर्थर रोडमध्ये. यानंतर ते फक्त खटल्यादरम्यान कोर्टात एकत्र आले होते. तसेच कोर्टातून तुरुंगात नेताना पोलिस व्हॅनमध्ये भेटले तेवढेच.
या व्हॅनमध्येच त्यांना काही खासगी क्षण मिळत होते, परंतु पीटर इथे डबा शेअर करतो आणि सार्वजनिक जागी मात्र ढुंकूनही पाहत नाही, याचा राग इंद्राणीला आला. म्हणून तिने पीटरला 'मला बोलू नकोस' म्हणून पत्र लिहिले आहे.
 
2002 मध्ये झाला होता पीटर आणि इंद्राणीचा विवाह
पीटर मुखर्जी आणि इंद्राणीने 2002 मध्ये विवाह केला होता. पीटर मुखर्जीचा हा दुसरा विवाह आहे. विवाहावेळी पीटर 46 तर इंद्राणी 30 वर्षांची होती. पीटरला पहिल्या पत्नीपासून दोन मुले आणि एक मुलगी आहे. दुसरीकडे, इंद्राणीला पहिल्या पतीपासून एक मुलगा आणि एक मुलगी (शीना बोरा) आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंद्राणीने पीटरसोबत दुसरा विवाह करताना एक गोष्ट लपवली होती. ती म्हणजे शीना बोरा ही आपली मुलगी नसल्याचे सांगितले होते. पीटरला तिने शीना तिची धाकटी बहीण असल्याचे सांगितले होते.
 
इंद्राणीने असा रचला शीनाच्या हत्येचा कट?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंद्राणीने दुसरा विवाह केल्यानंतर शीना आणि तिचा सख्खा भाऊ मिखाइल आजोळी निघून गेले होते. काही दिवसांनी शीना हिने मुंबईतील सेंट ज्येबियर कॉलेजात प्रवेश घेतला. त्याचप्रमाणे रिलायन्स कंपनीत एचआर एक्झिक्युटीव्ह म्हणून नोकरी ही करू लागली.
24 वर्षीय शीना आणि तिची आई इंद्राणीमध्ये अनेक मुद्यांवरून मतभेद होते. त्यात पीटरचा मुलगा राहुल आणि शीना यांच्यात लव अफेअर होते आणि तेच इंदाणीला पटत नव्हते. राहुल आणि शीना भेटायचे तेव्हा इंद्राणीची तळ पायाची आग मस्तकात जायची. यातून तिने शीनाच्या हत्येचा कट रचला.
दुसरीकडे, शीना आणि राहुलमध्ये प्रेम संबंध असल्याचे पीटर मुखर्जी यांनी म्हटले आहे.
पीटर म्हणाला, 'आमच्या लग्नाला 13 वर्षे झाली आहेत. शीना आणि माझा मुलगा राहुल यांच्यामध्ये प्रेम संबंध होते. हा संवेदनशील मुद्दा होता त्यामुळे आम्ही नाराज होतो. शीना आणि राहुलला विश्वासात घेऊन समजही काढली. दोघे विभक्त झाले. त्यामुळे या विषयावर आम्ही तीन वर्षांपासून काहीही चर्चा करत नव्हतो.
शीना 2012 पासून बेपत्ता होती. शीना अमेरिकेला गेल्याचे इंद्राणीने आम्हाला सांगितले होते. लॉस एंजल्समधले तिचे फोटो फेसबूकवर दिसायचे. परंतु तिचा काही पत्ता लागत नव्हता. तिचा फोन नंबर, ईमेल काहीही नव्हते. शीना भारतात येत नव्हती तेव्हा माझ्या मुलाने काहीतरी गडबड असल्याची शंकाही आल्याचेही पीटरने सांगितले आहे.
 
हायप्रोफाइल मर्डर मिस्ट्रीचा असा झाला भांडाफोड
21 ऑगस्टला मुंबई पोलिसांनी इंद्राणी मुखर्जीच्या ड्रायव्हर श्याम मोहन राय याला अवैध शस्त्रास्त्रांच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक केले. आरोपी श्याम मोहन रायच्या चौकशीत अनेक गोष्टी समोर आल्या. त्यात शीना बोरा हत्याकांडाचाही समावेश आहे.
श्याम मोहन राय यांनी पोलिसांना सांगितले की, इंद्राणीच्या सांगण्यावरूनची त्याने शीनाची हत्या केली. परंतु यात असून तिसर्‍या व्यक्तीचाही समावेश आहे. शीनाची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह रायगडमधील एका फार्महाऊस जवळ फेकण्यात आला होता. इंद्राणी हिच या हत्याकांडातील मास्टरमाइंड आहे.
रायगडमधील तथाकथित फार्महाऊस जवळ पोलिसांनी पाहाणी केली असता एका महिलेचा सापळा सापडला आहे. त्यानंतर पोलिसांनी इंद्राणी हिला 25 ऑगस्टला अटक केली.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...