आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indranis Driver To Cbi She Took 2 Hr Beauty Break On Day Of Murder

ड्रायव्हरचा दावा- शीनाच्या हत्येपूर्वी इंद्राणीने ब्युटी पार्लरमध्ये घालवले होते 2 तास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शीना बोराची हत्या करण्यापूर्वी तिची आई इंद्राणी मुखर्जी हिने दोन तास ब्युटी पार्लरमध्ये घालवले होते अशी माहिती तिचा ड्रायव्हर श्यामवर राय याने सीबीआयला दिली आहे. शीनाची हत्या ज्या रात्री झाली त्या दिवसाचा घटनाक्रम इंद्राणीचा ड्रायव्हर श्यामवर राय याने सीबीआयने ऐकवला. राय याच्या दाव्यानुसार, हत्येच्या दिवशी म्हणजेच 24 एप्रिल 2012 रोजी इंद्राणीने शीनाला नॅशनल कॉलेजजवळ बोलवण्याआधी ब्युटी पार्लरमध्ये दोन तास घालवले होते. एवढेच नव्हे तर इंद्राणीने तिचा मुलगा व शीनाचा भाऊ मिखाईलला मारण्यासाठी व त्याचा मृतदेह नष्ट करण्यासाठी जागाही निवडली होती.
पुढे वाचा, श्यामवर राय याने दिलेली धक्कादायक माहिती
- रायने सांगितले की, इंद्राणीने शीना व मिखाईल याला मारण्याचा आधीचा डाव रचला होता.

- रायने सांगितले की, जेव्हा आम्ही शीनाचा मृतदेह घेऊन पेणच्या दिशेने जाऊ लागलो तेव्हा खंडाळ्याजवळ इंद्राणीने अचानकपणे कार थांबविण्यास सांगितली. काही वेळ बाहेर थांबल्यावर ती कारमध्ये बसले व म्हणाली की, ही जागा मिखाईलसाठी योग्य आहे.
- 2012 मध्ये इंद्राणीची फॅमिली इंग्लडला फिरायला गेली होती. मार्चमध्ये तिने म्हटले स्काइपवर म्हटले होते की, मिखाईल व शीनाला मारायचे आहे. तिने मला सांगितले की, घरात सध्या संपत्तीवरून वाद सुरु आहे. शीनाचे सरांच्या (पीटर) मुलासोबत (राहुल) अफेयर आहे त्यामुळे मला तिला मारायचे आहे.
- रायने सांगितले की, इंद्राणीला मी मदत केली तर ती माझ्या सर्व कुटुंबाची जबाबदारी घेईल असे म्हणाली होती. दोन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण करेल. वैद्यकीय गरज लागली तर मदत करेल. तसेच महिना 10 हजार रूपये पगार देण्याचेही तिने वचन दिले.
- रायने सांगितले की, इंद्राणी जेव्हा एप्रिलमध्ये मुंबईत परतली. तेव्हा तिने मला मिखाईलशी बोलण्यास सांगितले. फोनवर मी मिखाईलला इंद्राणीचे पैसे कुठे आहेत याची माहिती दिली. आपण दोघे निम्मे-निम्मे वाटून घेऊ असे सांगितले मात्र मिखाईलने मुंबईत येण्यास नकार दिला.
- शीनाची कारमध्येच गळा दाबून हत्या केल्यानंतर इंद्राणीने मला हॉटेल ताजकडे कार आणण्यास सांगितले. इंद्राणी हॉटेलात 15 मिनिटे होती. त्यानंतर ती बाहेर आली व कार हॉटेलच्या गेटजवळ आणायला सांगितली. त्यानंतर आम्ही घरे गेलो.
- मिखाईलची हत्याही त्याच दिवशी करण्यात येणार होती. मात्र, तो बेशुद्ध होत नव्हता. अखेर संजय खन्नाच्या सूचनेनुसार त्याला दुस-या दिवशी मारण्याचा प्लॅन आखला. मात्र, मिखाईलला याचा सुगावा लागल्याने तो रात्रीच तेथून पसार झाला.