आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदू मिलच्या स्मारकात बाबासाहेब ‘बोलणार’, लाइव्ह म्युझियम उभे राहणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादरजवळील इंदू मिलमध्ये उभे राहत असलेल्या स्मारकात अत्याधुनिक दृकश्राव्य वस्तुसंग्रहालय बनवण्यात येणार आहे. त्यात तुम्हाला खुद्द बाबासाहेबांशी बोलण्याची संधी मिळणार आहे. इंदू मिलच्या साडेबारा एकराच्या विस्तीर्ण जागेतील बाबासाहेबांच्या या भव्यदिव्य स्मारकाचा आराखडा मुंबईतील नामवंत वास्तुविशारद शशी प्रभू यांनी बनवलेला आहे. २ लाख ४० हजार चौ. मी. क्षेत्रफळ जागेवरील या स्मारकात नाट्यगृह, वस्तुसंग्रहालय, ग्रंथालय, बाबासाहेबांचा पुतळा, भव्य स्तुपाची प्रतिकृती व मोकळी जागा असेल.
या स्मारकात ३ हजार ६८१ चौ. मी. वस्तुसंग्रहालय आहे. त्यात बाबासाहेबांचे आरंभकालीन जीवन, त्यांचा संघर्ष, विविध आंदोलने या संदर्भातील चित्रे असतील. तसेच वस्तुसंग्रहालय चार विशेष गॅलऱ्याही आहेत. त्यात राज्यघटना गॅलरी, पुनरुत्थान गॅलरी, संघर्ष गॅलरी आणि भावी पिढीला संदेश अशी त्यांची नावे आहेत. या स्मारकाचा कोनशिला समारंभ पुढच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पुढच्या तीनएक वर्षात स्मारक उभे राहील असे राज्य सरकारचे नियोजन आहे.

वस्तुसंग्रहालयातील दृकश्राव्य गॅलरीत बाबासाहेब तुमच्याशी बोलतील. बाबासाहेबांना तुम्ही त्यांच्या जीवनाशी, त्यांच्या कार्याशी, सामाजिक प्रश्नांबाबत कोणताही प्रश्न िवचारू शकाल. त्याला बाबासाहेब स्वत: उत्तर देतील. अगदी तुमच्यासमोर उभे राहून संवाद साधतील, अशी व्यवस्था केली जाणार आहे. या अत्याधुनिक पद्धतीच्या वस्तुसंग्रहालयासाठी तब्बल १७ कोटी ५४ लाख खर्च होणार आहेत. स्मारकाच्या समुद्राकडील बाजूस नाट्यगृह व ग्रंथालय असेल. नाट्यगृहाची बाराशे आसनांची क्षमता असून त्याला कॉमन प्लाझा आहे. जागेअभावी मुंबईत कॉमन प्लाझा अत्यंत दुर्मिळ बाब बनली आहे. स्मारकातील नाट्यगृहाशेजारील प्लाझामुळे येथे आलेल्या रसिकांना विरंगुळ्यांची चांगली सोय होणार आहे. समुद्राचा गार वारा अंगावर घेत गप्पांची मैफल करता येणार आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा लंडनच्या धर्तीवर ग्रंथालय...
लंडनच्या धर्तीवर ग्रंथालय
‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ मधून बाबासाहेबांनी पीएच. डी. पूर्ण केली. त्यांनी विद्यार्थी दशेचा बराच काळ अध्ययनासाठी याच ग्रंथालयात व्यतीत केला. त्याच्या धर्तीवर स्मारकात वर्तुळाकार ग्रंथालय बनवण्यात येत आहे. येथे संशोधकांना उपयोगी पडतील असे उत्तोमोत्तम ग्रंथ येथे असतील. बाबासाहेबांची पुस्तके, त्यांची दुर्मिळ चित्रे, त्यांची भाषणे, लेख हे सारं काही या ग्रंथालयात अॅपद्वारे तुमच्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करता येईल. या ग्रंथालयासाठी ९ कोटी खर्च येणार आहे.

वस्तुसंग्रहालय म्हणजे केवळ वस्तू व चित्रे ही संकल्पना आता कालबाह्य झाली आहे. म्हणून आम्ही या स्मारकात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. तुम्ही येथे बाबासाहेबांशी संवाद साधू शकाल तसेच त्यांच्या संदर्भातील माहिती मोबाइलमध्ये डाऊनलोड करू शकाल. शशी प्रभू, आंबेडकर स्मारकाचे आर्किटेक्ट.