आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indumill Land Acquired By Maharashtra Government

डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न सुटला, इंदूमिलची जागा महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: इंदूमिलच्या जागेचा प्रश्न सुटला असून लवकरच तिथे डॉ.आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंजाब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
सरकार आणि केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय (एनटीसी)आणि राज्य सरकार यांच्यात द्विपक्षीय करार झाला असून या करारांतर्गत एनटीसी य सरकारला 12 एकर जागा देणार आहे, तर सरकार एनटीसीला जागेचा मोबदला देणार आहे. मोबदल्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.
विशेष म्हणजे पुढील वर्षी म्हणजेच 2016 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 125 वी जयंती आहे, आणि त्याच वर्षी स्मारकही होणार असल्याने मला त्याचा आनंद आहे. सध्या पंतप्रधान परदेश दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांची तारीख घेऊन आम्ही त्यांच्या हस्ते भूमिपुजन करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नवी दिल्लीत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री संतोष गंगवार यांनी या हस्तांतरण करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासमोर स्वाक्षरी केली आहे. या स्मारक उभारणीच्या कामाचं भूमीपूजन बाबासाहेबांच्या जयंती दिनी म्हणजे 14 एप्रिल करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 डिसेंबर रोजी जाहीर केले होते. आता ही जागा राज्य सरकारच्या ताब्यात आल्याने, स्मारकारच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला वेग येणार आहे.