आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्योगांच्या पाण्याने नद्या धोक्यात- जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्रात अर्ध्याहून अधिक धरणांचे पाणी उद्योगांकडे जाते. या उद्योगांमधील प्रदूषित पाणी नद्यांमध्ये जाऊन नद्या नष्ट करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नद्यांचे आरोग्य तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. नद्यांचे आरोग्य मानवी आरोग्याशी जोडण्याची आवश्यकता आहे, असे मत जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले. राज्यात जल सुरक्षा अधिनियम लागू करावा, असे ते म्हणाले.

मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघातील वार्तालापात सिंह म्हणाले, महाराष्ट्रात एकेकाळी पाणीटंचाई नव्हती. आज मात्र टंचाईत वरचा क्रमांक लागतो, हे दुर्दैवी आहे. गेल्या दोन वर्षांत राज्यात दोन हजार सातशे कोटी रुपये सूक्ष्म सिंचनावर खर्च झाले आहेत. सूक्ष्म सिंचनावरील हा खर्च सर्वाधिक आहे. तरीही मराठवाड्यात कोरड पडल्याचे दिसून येते. ऊस नगदी पीक आहे. परिणामी लागवड मोठ्या प्रमाणावर होते. मात्र,उसाला जास्त पाणीही लागते. नद्या, विहिरी कोरड्या पडल्या. दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत, असेही ते म्हणाले.

जलयुक्त मोहिमेत काॅन्ट्रॅक्टर घुसू देऊ नका
नद्या जोड प्रकल्प हा रोगापेक्षा इलाज भयंकर असा आहे. नद्यांचे पाणी खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा हा प्रकार असून देश तोडण्याचा हा प्रयत्न आहे. नद्या जोडण्यांपेक्षा नद्यांशी लोकांना जोडण्याची गरज आहे. जलयुक्त शिवार योजना चांगली आहे. एका वर्षात त्याचे परिणाम येणार नाहीत. पण या योजनेत काॅन्ट्रॅक्टर घुसू दिले नाहीत तर याचा चांगला उपयोग होईल, असे सिंह म्हणाले.

सिंह यांचे सल्ले
>उसामुळे दुष्काळस्थिती गंभीर. >पद्धत बदलून मातीला अनुकूल पिके घ्यावीत, तरच धोका टळेल. > उसासाठी पावसाच्या पाण्याचा थेट वापर टाळावा.