आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गीतकार साहिर लुधियानवींवर मराठी भाषेत पुस्तक येणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- “मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है’ हे गाणे लिहून आपल्या जीवनाचे सार सांगणारे गीतकार साहिर लुधियानवी यांच्यावर एकही पुस्तक आजवर मराठीत उपलब्ध नव्हते. मात्र, ही कमतरता आता रोहन प्रकाशन प्रसिद्ध करत असलेल्या “लोककवी साहिर लुधियानवी’ या अनुवादित नव्या पुस्तकामुळे भरून निघणार असून ते साहिर यांच्यावरील पहिले मराठी पुस्तक ठरणार आहे.   

यासंदर्भात रोहन प्रकाशनचे प्रदीप चंपानेरकर म्हणाले,  गुरुदत्तचा “प्यासा’ हा चित्रपट पाहिल्यानंतर लुधियानवी यांनी लिहिलेली गाणीही मनात रुजली होती. संधी मिळेल तेव्हा साहिर यांच्यावर एक पुस्तक प्रकाशित करायचे हे मनोमन ठरवले होते. दोन वर्षांपूर्वी “साहिर लुधियानवी : द पीपल्स पोएट’ हे पुस्तक अक्षय मनवानी यांचे इंग्रजी पुस्तक वाचनात आले. ते वाचल्यानंतर हे पुस्तक मराठीत आणण्याचा निर्णय घेतला.     

साहिर यांचे निकटवर्तीय यश चोप्रा, देव आनंद, जावेद अख्तर, खय्याम, सुधा मल्होत्रा, रवी शर्मा, रवी चोप्रा आदींच्या मुलाखती घेऊन हे पुस्तक अक्षय मनवानी यांनी लिहिले  आहे.  या इंग्रजी  पुस्तकाचा चंपानेरकर यांनी अनुवाद केला आहे.  या पुस्तकाची पृष्ठसंख्या ३०० असून त्याची किंमत ३२० रुपये आहे. येत्या २५ मेपासून हे पुस्तक सर्वत्र विक्रीसाठी उपलब्ध होईल. साहिर यांनी लिहिलेल्या गाण्यांची यादीही या पुस्तकात  दिली आहे.   
बातम्या आणखी आहेत...