आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 एक्स्प्रेस गाडया रद्द, कन्याकुमारी एक्स्प्रेस चिंचवड स्थानकावर 5 तासांपासून उभी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/नाशिक - हार्बर आणि मध्य रेल्वेची वाहतूक सुरू झाली आहे. कसारा घाटातील वाहतूकही सुरळित सुरु झाली आहे. पावसामुळे अनेक रेल्वेगाड्या मात्र रद्द करण्यात आल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी कन्याकुमारीहून निघालेली कन्याकुमारी एक्स्प्रेस चिंचवड स्थानकावर 5 तास उभी आहे. पुणे-भुसावळ गाडी मळवलीतून माघारी नेण्यात आली आहे.
 
या एक्स्प्रेस गाडया रद्द
मुंबईहून सुटणाऱ्या मुंबई-नांदेड तपोवन, दादर-जालना जनशताब्दी, दादर-मनमाड, मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्सप्रेस, मुंबई-सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी ते कुर्ला लोकल हार्बर फेऱ्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.
 
कसारा घाट सुरू
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईहून नाशिकला येणाऱ्या जुन्या कसारा  घाटात बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याने एका लेनची वाहतूक दीड तास बंद करण्यात आली होती.  दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात  आल्याने दीड वाजता वाहतूक सुरळीत करण्यात आली.
       कसारा घाट व परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची घटना घडली. वाहनचालकांनी घटनेची माहिती पिक इन्फ्रा कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली.   कंपनीचे सुरक्षा अधिकारी विजय राठोड , कर्मचारी ऊमेर शेख, सचिन भडांगे,शिवा कातोरे, जावेद खान, वसिम शेख, संदिप म्हसणे, राजु मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत सुरक्षेसाठी बरेगेट्स लावण्यात आले. जे. सी .बी.च्या साहयाने दीड तास युद्धपातळीवर काम करून ढिगारा हटविण्यात आला.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
 
 
 
बातम्या आणखी आहेत...