आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तम खोब्रागडे माफी मागा, अन्यथा फाैजदारी खटल्याला सामाेरे जा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी राज्याचे माजी मुख्य सचिव आणि माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्यावर केलेले बेछूट आरोप त्यांना आता चांगलेच महागात पडले आहेत. गायकवाड यांनी खोब्रागडे यांना वकिलाकरवी कायदेशीर नोटीस बजावली आहे. आंबेडकर भवनचा वाद शमला असला तरी दोघा आंबेडकरी माजी आयएएस अधिकाऱ्यांतला वाद मात्र चांगलाच शिगेला पोहोचला आहे.
१९ आॅगस्ट रोजी खोब्रागडे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये रत्नाकर गायकवाड यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) चेअरमनपदी असताना तसेच राज्याचे मुख्य सचिव असताना अनेक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. बेछूट अाणि बिनबुडाचे आरोप केल्याबाबत गायकवाड यांनी उच्च न्यायालयातील वकील अॅड. संतोष सांजकर यांच्यामार्फत नुकतीच नोटीस बजावली आहे.
दादरचे आंबेडकर भवन एका बिल्डरच्या घशात घालण्यासाठी गायकवाड यांच्या आदेशाने पाडण्यात आले. एमएमआरडीएचे चेअरमन असताना गायकवाड यांनी कांदिवली आणि ओशिवरा येथील भूखंड एका बिल्डरला बेकायदा दिले. बृहन्मुंबई बहुजन पतपेढी आणि माताेश्री वृद्धाश्रम या संस्थांना झी ग्रुपकडून करोडोंच्या देणग्या िमळवून िदल्या अादी आरोप खोब्रागडे यांनी पत्रकार परिषदेत केले होते.
नोटीस िमळाल्यापासून सात िदवसांच्या आत उत्तर द्यावे आणि लेखी माफी मागावी, अन्यथा भादंवि ४९९ आणि ५०० नुसार फौजदारी दावा दाखल करण्यात येईल, असे खोब्रागडे यांना नोटिसांद्वारे सांगण्यात आले आहे. उत्तम खोब्रागडे सध्या निवृत्त आहेत तसेच ते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या ‘िरपाइं’ पक्षात कार्यरतही आहेत. आठवले यांनी आंबेडकर भवनाच्या वादात गायकवाड यांच्या समर्थनाची भूमिका घेतली होती. त्याच वेळी खोब्रागडे यांनी मात्र गायकवाड यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन गायकवाड यांच्यावर अनेक आरोप केले होते.
वादाचे मूळ कारण
आमचेअशील रत्नाकर गायकवाड मुख्य सचिव होते त्या वेळी तुम्ही आदिवासी िवकास िवभागाचे सचिव होता. तेव्हा त्या िवभागाचा पाचशे कोटींचा िनधी वापरता आपण केंद्राला परत पाठवला. तेव्हा मुख्य सचिव या नात्याने आमच्या अशिलाने तुमची िवभागांतर्गत चौकशी लावली होती. त्याला अद्याप केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण तसेच उच्च न्यायालयानेही आपण मागणी करूनही सूट िदली नाही. तुमची अद्याप चौकशी सुरू आहे. तो राग तुम्ही मनात ठेवून आमचे अशील रत्नाकर गायकवाड यांच्याविरोधात पत्रकार परिषदेत सूडबुद्धीने आरोप केल, असे या नोटिशीत म्हटलेले आहे.
बातम्या आणखी आहेत...