आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्फोसिसचा प्रकल्प राज्यात खेचून आणू, मुख्यमंत्र्यांचा निर्धार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इन्फोसिसने प. बंगालमधील आपला आयटी प्रकल्प गुंडाळण्याचा इशारा ममता बॅनर्जी सरकारला दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर इन्फोसिसची ही प्रस्तावित गुंतवणूक महाराष्ट्राकडे वळवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होत आहे.
टाटांचा बंगालमधील नॅनो कार प्रकल्प अडचणीत अाल्यानंतर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी ताे राज्यात खेचून नेला होता. याच धर्तीवर आता इन्फोसिसचा हा प्रकल्प महाराष्ट्रात,खासकरून विदर्भ किंवा मराठवाड्यात नेण्याचा प्रयत्न सरकार करू शकते. राज्याच्या नव्या आयटी धोरणातही इन्फोसिसच्या मागण्या विचारात घेतल्या जाऊ शकतात, असेही सूत्रांनी सांगितले.

इन्फोसिसचे स्वागतच
इन्फोसिसने ही प्रस्तावित गुंतवणूक राज्यात करावी म्हणून आम्ही प्रयत्न करू. तसेच त्यांना राज्यात गुंतवणूक करण्यासाठी सर्वतोपरी मदत करू.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
इन्फोसिसचा २००८ मध्ये बंगालमध्ये सॉफ्टवेअर विकास केंद्र उभारणीचा करार डाव्या सरकारशी.

15000 रोजगार निर्मिती
50 एकर जागा
75 कोटी रुपये भूसंपादनास अॅडव्हान्स

प्रकल्पाला सेझचा दर्जा द्या वा पैसे परत करा, असा इशारा इन्फोसिसने बंगालला दिला.