आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमी पोलिस निरीक्षकाचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सहायक पोलिस निरीक्षक दिलीप शिर्के यांच्या गोळीबारात गंभीर जखमी झालेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास जोशी यांचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हल्ल्यात जखमी झालेले बाळासाहेब अहिर यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिर्के यांनी शनिवारी संध्याकाळी पाेलिस ठाण्यात येऊन जोशी यांच्याशी वाद घातला. त्यावेळी जोशी ठाण्याबाहेर पडत असताना शिर्केंनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने त्यांच्या पाठीवर दोन गोळ्या, तर आहिर यांच्यावर एक गोळी झाडली. नंतर लगेच स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली. जोशी आणि आहिर यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात होते. यात जोशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.