आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरा गमावला; ना भरपाई, ना न्याय, नुरुल्ला शरीफ यांच्या पत्नीची व्यथा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेगमजहाँ - Divya Marathi
बेगमजहाँ
मुंबई - २८ सप्टेंबर २००२ च्या काळरात्री मी माझे पती नुरुल्ला शरीफ यांना कायमचे गमावून बसले... ६ मे २०१५ रोजी मुंबईतील सत्र न्यायालयाने हिट अँड रन प्रकरणात अभिनेता सलमानला दोषी ठरवून मृताच्या वारसदारांना १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला होता. त्या वेळी वाटले होते की आम्हाला न्याय मिळाला... पण आता उच्च न्यायालयाने सलमानची निर्दोष मुक्तता केली. मात्र, या अपघातानंतर आम्हाला ना नुकसान भरपाई मिळाली ना न्याय... अशी खंत मृत नुरुल्ला शरीफ यांची पत्नी बेगमजहाँ यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना
व्यक्त केली.

मुंबईतील मालाड या उपनगरामध्ये मालवणी विभागातल्या गेट क्र. ७ पासून सुमारे एक किमी अंतर पायी गेले की, आझमीनगर झोपडपट्टी लागते. तिथे बेगमजहाँ राहतात. त्यांनी पुनर्विवाह केला असून द्वितीय पती हारुण खान यांच्यासोबत त्यांचा संसार सुरू अाहे. नुरुल्ला शरीफ हयात असताना बेगमजहाँ विलेपार्लेतील शास्त्रीनगर विभागात राहत असत. मात्र, नुरुल्लाच्या मृत्यूनंतर बेगमजहाँ व त्यांचा मुलगा फिरोज शेख यांच्यावर अस्मानच कोसळले. जगण्यासाठी उपजीविकेची साधने अत्यंत अपुरी होती. आयुष्यात भक्कम आधाराची गरज होती. त्यामुळे बेगमजहाँ यांनी हारुण खान यांच्याशी विवाह केला. बेगमजहाँ यांनी सांगितले की, ‘सलमानच्या गाडीखाली चिरडून मरण पावलेल्या तसेच जखमी झालेल्यांना भरपाई देण्याचा आदेश सत्र न्यायालयाने दिला होता तेव्हा असे वाटले होते की हे पैसे मिळाले तर आयुष्यात तगून राहायला थोडीतरी मदत होईल. पण या भरपाईतला एकही पैसा अजूनही आम्हाला मिळालेला नाही. नुरुल्ला शरीफ यांच्या दफनविधीच्या वेळी वकील ए. ए. हमदानी यांनी मला भेटून न्यायप्रक्रियेसंदर्भात मदत करण्याचे अाश्वासन दिले होते. त्यानंतर काही महिने त्यांनी मदत केली पण पुढे त्यांच्याकडूनही काही प्रतिसाद मिळेनासा झाला.’ घर चालवण्यासाठी बेगमजहाँदेखील छाेट्याशा कंपनीत नोकरी करतात. त्यांना पगार मिळतो फक्त तीन हजार रुपये. अशा तुटपुंज्या उत्पन्नात त्या व त्यांचे कुटुंबीय जगत आहेत. सकाळी ९ वाजता त्या कामावर जातात व रात्री सातला घरी येतात. दिवसभर काम करूनही महिनाअखेर हाती येणारे कमी वेतन हे त्यांच्या निराशेत अजून भर घालते.
पुढील स्‍लाइडसवर वाचा, मुलाचे नाव ठेवले सलमान...