आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत 62 लाख घरांची झाडाझडती; डासांची उत्पत्ती आढळलेल्या 8 हजार घरांना नोटिसा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- डेंग्यू, मलेरिया यांसारख्या रोगांना आळा बसावा यासाठी डासांची उत्पत्तिस्थाने शोधण्यासाठी मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने मागच्या सहा महिन्यांत तब्बल ६२ लाख घरांची पाहणी केली. त्यात ७ हजार ५८६ घरी डेंग्यूच्या, तर २ हजार ६७४ घरांमध्ये मलेरिया डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत.  
  
जानेवारी ते जुलै या सहा महिन्यांच्या कालावधीदरम्यान पालिकेच्या कीटकनाशक विभागाने ६२ लाख ४३ हजार ५९७ गृहभेटी केल्या. या तपासणीत डासांची उत्पत्तिस्थाने असणाऱ्या ८ हजार ७४४ घरमालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.   तसेच त्यांच्याकडून नियमानुसार २० लाख ४ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.    

गृहभेटीत डेंग्यूवाहक डासांची ७ हजार ५८६ उत्पत्तिस्थाने; तर मलेरियावाहक डासांची २ हजार ६७४ उत्पत्तिस्थाने नष्ट करण्यात आली. डेंग्यू विषाणूवाहक डासांच्या अळ्या फेंगशुई झाड, बांबू प्लँट्स, मनी प्लँट्समधील अतिरिक्त पाणी तसेच कुंड्यांखाली ठेवलेल्या ताटल्या (प्लेट्स), वातानुकूलन यंत्रणा, शीतकपाटाचा (रेफ्रिजरेटर) डिफ्रॉस्ट ट्रे यांसारख्या विविध स्रोतांमध्ये उत्पत्ती होते, असे पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.   

महापालिकेच्या उपाययोजना
मुंबईत जलजन्य आजार पावसाळ्यात डोके वर काढत असतात.  त्यात लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, मलेरिया आणि स्वाइन फ्लू यांचा प्रादुर्भाव शहरातील नागरिकांना होत असतो. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिका विविध उपाययोजना करत आहे. त्याचाच भाग म्हणून कीटकनाशक विभागाकडून गृहभेटी केल्या जातात.     
बातम्या आणखी आहेत...