आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा 26/11 झाल्यास समुद्रातच दहशतवाद्यांना ठार करेल आयएनएस कोची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - २६ / ११ मुंबई हल्ल्यानंतर देशाचा पश्चिमी समुद्रकिनारा अधिक सुरक्षित करण्यासाठी नौदलाने मोठे पाऊल उचलले आहे. ३० सप्टेंबर रोजी कोलकाता श्रेणीची अति उच्च दर्जाची युद्धनौका "आयएनएस कोची' नौदलात दाखल होणार आहे. याआधी मंगळवारी हायस्पीड असलेल्या तीन युद्धनौका समुद्रतटावर गस्त घालणार आहेत.
महाराष्ट्र आणि गुजरात नौसेना क्षेत्राचे कमांडिंग फ्लॅग अधिकारी रिअर अॅडमिरल मुरलीधर पवार यांनी सांगितले, ‘२६/११ घटनेची पुनरावृत्ती झाल्यास दहशतवाद्यांना समुद्रातच घेरून ठार केले जाईल. तसेच हायस्पीड असलेल्या तीन युद्धनौका मंगळवारपासून नौदलात दाखल होणार आहेत. यात अत्याधुनिक संदेश यंत्रणा, मशीनगन आणि इतर सुविधा असेल. या युद्धनौकेमुळे समुद्रकिनाऱ्यांची सुरक्षा मजबूत होईल. पश्चिमी समुद्र क्षेत्रात येणाऱ्या सुमारे ६५ हजार मच्छिमारांना बायोमेट्रिक ओळखपत्र देण्यात येतील,’ असेही ते म्हणाले.

आयएनएस कोचीची वैशिष्ट्ये
-१६४ मीटर लांबी, १७ मीटर रुंद
-७५०० टन वजन, ३० किमी प्रतिवेग
-युद्धनौकेत मिसाइल, शत्रूंच्या रडारला चुकवण्याची क्षमता
-यात ३० अधिकाऱ्यांसह ३५० जवान तैनात राहतील
-पूर्णपणे स्वदेशी बनावटीची
-महिला अधिकाऱ्यांचाही सहभाग
-युद्धनौकेत १६ सुपरसॉनिक ब्रम्होस मिसाइल. याशिवाय ७६ एमएमची सुपर रॅपिड गन आणि एके- ६३०.
-युद्धनौकेत सिकिंग आणि चेतकसारखे हेलिकॉप्टर असतील.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज....