आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता भारताकडे वाकड्या नजरेने कोणीही पाहू शकत नाही- नरेंद्र मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आयएनएस कोलकाता ही नौका नौदलाला समर्पित करण्यात आली)
मुंबई- सागरी सुरक्षेसाठी आरमाराचा सर्वप्रथम राजे शिवाजी महाराज यांनी वापर केला होता. आता भारताने आयएनएस कोलकातासारखी स्वदेशी बनावटाची सर्वात बलाढ्या विनाशिका तयार केल्याने आता कोणाचीही भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. भारताच्या सामर्थ्याचं दर्शन जगाला झाले आहे. व्यापारासाठी सागरी सुरक्षेसाठी ही बाब महत्त्वाची बाब असल्याचेही मोदींनी स्पष्ट केले. तर, संरक्षणमंत्री अरूण जेटली यांनी नौदलासाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विकासकामांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. सकाळी नऊ वाजता मोदींचे मुंबईत आगमन झाले. त्यानंतर सकाळी साडे दहाला मोदींच्या हस्ते आयएनएस कोलकाता ही नौका नौदलाला समर्पित करण्यात आली. आयएनएस कोलकाता ही देशाच्या नौदलाची ताकद वाढवणारी आणि देशाला एक नवी ओळख देणारी स्वदेशी बनावटीची सर्वात मोठी युद्धनौका आहे. यावेळी संरक्षणमंत्री अरूण जेटली, राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह नौदलाचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.

मोदी म्हणाले, महाराष्ट्रात आले की जानता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. शिवरायांनी चारशे वर्षापूर्वी व्यापार वृद्धीसाठी समुद्रीय संरक्षणाची गरज ओळखली होती. व्यापारासाठी सागरी सुरक्षा तेव्हाच तितकीच महत्त्वाची होती जितकी आज आहे. आजपर्यंत आपण विदेशातून बहुतेक यत्रंसामग्री खरेदी करीत होतो. मात्र आयएनएस कोलकाता ही ही संपूर्ण भारतीय व स्वदेशी बनावटीची युद्धनौका आपल्या अभियंत्यांनी बनविली आहे. त्यांचे मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. भारतीयांत बुद्धीवंतांची कमी नाही हेच यातून सिद्ध झाले आहे. देशाच्या सव्वाशे कोटी जनतेचा पाठिंबा आणि शुभेच्छा सैनिकांच्या पाठिशी असल्याचे मोदींनी स्पष्ट केले.
आयएनएस कोलकाता ही युद्धनौका आपल्या नौदलाची व देशाची सर्वात प्रभावी ताकद ठरणार आहे. आधुनिक सैन्य व त्याची सज्जता शक्तिशाली असेल तर युद्धाची स्थिती निर्माण होत नाही. कारण त्यांच्याकडे सामर्थ्याशाली म्हणून पाहिले जाते. आता भारताच्या सामर्थ्याकडे पाहून कोणीही आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही हा मला विश्वास आहे, असे मोदींनी सांगितले.
पुढे वाचा, आयएनएस कोलकाताची खास वैशिष्टये...