आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • INS Vikrant Gets Another Lifeline From Supreme Court

आयएनएस विक्रांतच्या लिलावास स्थगिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय नौदलाची विमानवाहू नौका ‘आयएनएस विक्रांत’च्या लिलावास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. न्यायमूर्ती के. एस. राधाकृष्णन आणि न्यायमूर्ती विक्रमजित सेन यांनी हा निर्णय दिला. तसेच संरक्षण मंत्रालय आणि संबंधित व्यक्तींना नोटीसही बजावली आहे.
युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्याची मागणी करणारी जनहित याचिका किरण पैंगणकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र, ही याचिका फेटाळून लावत विक्रांतचा लिलाव करण्यास न्यायालयाने संमती दिली होती. त्यानंतर पैंगणकर यांनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने स्थगितीचा निर्णय दिला. आयबी कर्मशियल कंपनीने आयएनएस विक्रांतची 60 कोटी रुपयांना खरेदी केली होती.
1997 मध्ये नौदलाच्या सेवेतून सन्मानाने निवृत्त होणारी ‘आयएनएस विक्रांत’ ही पहिलीच युद्धनौका आहे. 1957 मध्ये भारताने ही युद्धनौका विकत घेतली होती. तिचे नामकरण आयएनएस विक्रांत असे करण्यात आले. सी हॉकसारखी लढाऊ विमाने, पाणबुडीविरोधी विमाने, हेलिकॉप्टर या युद्धनौकेवर राहू शकत होती. 1971 च्या पाकिस्तानविरोधातील युद्धात या युद्धनौकेने महत्त्वाची भूमिका बजावली होती. या युद्धनौकेवरील सी हॉक या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या विरोधात पूर्व पाकिस्तानच्या (सध्याचा बांगलादेश) चितगाव बंदर आणि नौदलाच्या तळावर जोरदार हल्ले केले होते.