आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आयएनएस विक्रांत’ जहाजाचा नौदल करणार लिलाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे 1९७1 च्या भारत-पाक युद्धातील गौरवशाली कामगिरीची साक्ष देणारी ‘आयएनएस विक्रांत’ ही युद्धनौका मोडीत निघणार आहे. भारतीय नौदलातून निवृत्त झाल्यानंतर मुंबई किना-यावर उभ्या असलेल्या आयएनएस विक्रांत या भव्य जहाजाचा खर्च सरकारला पेलवणारा नसल्याने लवकरच त्याचा ई-पद्धतीने लिलाव करणार असल्याचे मंगळवारी नौदलाकडून स्पष्ट करण्यात आले. लिलावाद्वारे विकत घेतल्यावर त्याचे संग्रहालयात रूपांतर करावे किंवा ते जहाज मोडीत काढावे याचा निर्णय खरेदीदाराचा असेल, अशी माहिती वेस्टर्न नेव्हल कमांडचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल शेखर सिन्हा यांनी दिली.
एकेकाळी ७5 कोटींत या नौकेचे कायमस्वरूपी संग्रहालयात रूपांतर करण्याची चालून आलेली संधी राज्य सरकारने वेळोवेळी दवडल्याने ही किंमत आता 500 कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. त्यात राज्य सरकारने वेळोवेळी करंटेपणा दाखवला होता. परिणामी आता ही युद्धनौका मोडीत निघणार, हे स्पष्ट झाले आहे.