आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना आजपासून 10 हजारांचे कर्ज; आजी-माजी आमदार, खासदारांसह \'यांना\' मिळणार नाही लाभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची घाेषणा झाली असली तरी ही प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब लागत अाहे. त्यामुळे पेरणीसाठी तातडीने १० हजार रुपयांचे कर्ज देण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केली होती. याबाबतचा शासननिर्णय बुधवारी मध्यरात्री जाहीर करण्यात आला. त्यानुसार आता गुरुवारपासून शेतकऱ्यांना हे तातडीचे कर्ज उपलब्ध होणार आहे. ही रक्कम जुलैमध्ये मिळणाऱ्या नवीन कर्जातून कपात केली जाईल.
 
३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी तातडीने ही रक्कम उपलब्ध करून द्यावी, असे आदेश जिल्हा बँका व व्यापारी बँकांना देण्यात आले आहेत. या कर्जासाठी राज्य शासन हमी देणार आहे. अशा शेतकऱ्यांचे स्वतंत्र खाते उघडून त्यात १० हजार रुपये मर्यादेपर्यंत कर्ज  दिले जाईल.

यांना मिळणार नाही लाभ
- केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी, निवृत्त शासकीय कर्मचारी, प्राप्तिकर परतावे भरणारी व्यक्ती, डॉक्टर, वकील, चार्टर्ड व कॉस्ट अकाउंटंट, अभियंता.
- आजी-माजी आमदार, खासदार, जि. प. व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, बाजार समिती, साखर कारखाना, सूतगिरणीचे संचालक.
- ज्या कुटुंबातील सदस्याच्या (पत्नी, पती, आई-वडील, मुलगा, अविवाहित मुलगी, सून) नावावर चारचाकी वाहन आहे.

शपथपत्र सक्तीचे : हे कर्ज घेण्यापूर्वी शेतकऱ्याकडून शपथपत्र भरून घेतले जाईल. नियमांचे उल्लंघन करून हे कर्ज लाटण्याचा कुणी प्रयत्न केला तर दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही शासनादेशात नमूद अाहे.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, राज्‍य शासनाचा संपूर्ण जीआर...
बातम्या आणखी आहेत...