आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Insurance Company News In Marathi, Shen Visa Authority, Divya Marathi

26 देशांमधील 14 विमा कंपन्यांचा काळ्या यादीत समावेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शेनझेन व्हिसा अ‍ॅथॉरिटीने 14 विमा कंपन्यांना विविध अनियमिततांसाठी ब्लॅक लिस्ट केले आहे. यात नॅशनल इंश्युरंस आणि एसबीआय लाइफ यांचाही समावेश आहे. त्यामुळे या विमा कंपन्यांकडून देण्यात येणारा पर्यटन व आरोग्य विमा शेनझेन देशांना मान्य नसेल. शेनझेन अ‍ॅथॉरिटी 26 देशांसाठी एकसारका व्हिसा जाहीर करते. यात युरोपातील 23 आणि 3 इतर देशांचा समावेश आहे.


अ‍ॅथॉरिटीने इतर 14 कंपन्यांना मंजुरी दिली आहे. पर्यटनासाठी व्हिसाचा अर्ज करणा-यांनीही केवळ याच कंपन्यांकडून पर्यटन व आरोग्य विमा घेण्याचा सल्ला दिला आहे. पर्यटन विमा व्यवसायाच्या दृष्टीने एप्रिल-मे हा अत्यंत महत्त्वाचा कालावधी असतो. या काळात पर्यटनाचे प्रमाण अधिक असते. तसेच विद्यार्थिही याच काळात अधिकाधिक प्रवास करत असतात. त्यातच ही बाब समोर आल्याने विमा कंपन्यांच्या चिंता वाढल्या आहेत.
ब्लॅकलिस्ट कंपन्या: आयसीआयसीआय लोम्बार्ड, भारती एक्स, एलअँडटी जनरल इंश्युरंस, रॅलिगेयर हेल्थ इंश्युरंस आणि रहेजा क्यूबीई.
प्रमुख शेनझेन देश : स्वित्झर्लंड, इटली, ग्रीस, जर्मनी, पोलंड, स्पेन, स्वीडन, नॉर्वे, नेदरलँड्स, हंगेरी, आइसलँड, पोर्तुगाल, लिक्टेंस्टाईन आदी.
ब्लॅकलिस्ट करण्याचे कारण : विमा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते व्हिसा अ‍ॅथॉरिटीने हे पाऊल उचलण्याचे कारण म्हणजे, ब्लॅक लिस्ट केलेल्या कंपन्या त्यांच्या मानकांनुसार उपाय योजना करत नव्हत्या. यात मोठ्या प्रमाणात दावे फेटाळले जाणे, अपु-या सेवा आणि आयटी क्षेत्रातील सोयीसुविधा अशा कारणांचा समावेश आहे.


आयसीआयसीआय लोम्बार्डने दिले उत्तर
यासंदर्भात संपर्क केला असता आयसीआयसीआय लोम्बार्ड वगळता एकाही कंपनीने उत्तर दिले नाही. कंपनीच्या सर्व पर्यटन विमा योजना सर्व दूतावासांच्या अपेक्षेप्रमाणे असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. आयटी क्षेत्राच्या अपग्रेडेशनसंबंधी काही त्रुटी होत्या. त्या दूर करून संबंधित अधिका-यांना कळवल्याचेही कंपनीतर्फे सांगण्यात आले.