आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामान्यांसाठी विमा, पेन्शन योजना शनिवारपासून लागू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या तीन योजनांचे लोकार्पण शनिवारी (दि. ९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत करण्यात येणार आहे. राज्यात या योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाच्या पदवीदान सभागृहात होणार आहे. या वेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री विनोद तावडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, भारतीय आयुर्विमा महामंडळाचे अध्यक्ष एस. के. रॉय, बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक एस. मुहनोत उपस्थित राहतील.