आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील आंतरजातीय विवाहांत दुपटीने वाढ, २ हजार २७५ जोडप्यांनी लाभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात प्रतिवर्षी सरासरी दोन हजार ते बावीसशे आंतरजातीय विवाह होत असतात. मात्र, यंदा जानेवारी ते जून यादरम्यान २ हजार २७५ जातीबाहेर लग्न केलेल्या जोडप्यांनी समाजकल्याण िवभागाच्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेच्या लाभ घेतला आहे. यंदा पहिल्यांदाच राज्यातील आंतरजातीय विवाहाच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘अॅनिहिलेशन आॅफ कास्ट’ (जातीचे निर्मूलन) हा ग्रंथ अत्यंत वादळी ठरला होता. त्या ग्रंथात बाबासाहेबांनी भारतातील जातीव्यवस्थेचे परखड विश्लेषण केले होते. बाबासाहेबांनी सांगितलेल्या त्रिसूत्रीपैकी एक म्हणजे आंतरजातीय विवाह करणे. पुढे महात्मा गांधीजी यांनीसुद्धा जात िनर्मूलनासाठी आंतरजातीय िववाहाचा कार्यक्रम हाती घेतला.

योजनेत पात्र ठरण्यासाठी लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी हवा. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, िवमुक्त जाती, भटक्या जमाती व्यक्तीपैकी एक व्यक्ती व दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, लिंगायत, जैन, शीख यांच्यातील असल्यास तो आंतरजातीय विवाह ठरतो. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, िवमुक्त जाती, भटक्या जमाती या मधील अांतरप्रवर्गातील विवाहसुद्धा आंतरजातीय समजण्यात येतो.

आंतरजातीय विवाह केलेले निम्मे अधिक जोडपी अर्थसाहाय्यासाठी समाजकल्याण िवभागाकडे अर्ज करत नाहीत. अनेकांच्या अर्जात त्रुटी असतात, योग्य ती कागदपत्रे जोडलेली नसतात, त्यामुळे अनेक जोडपी अपात्र ठरतात. मात्र, प्रत्यक्षात आंतरजातीय विवाह करणाऱ्यांची संख्या याच्यापेक्षा मोठी असू शकते, अशी माहिती समाजकल्याण िवभागातील अधिकाऱ्याने िदली.
आंतरजातीय विवाहांची माहिती
वर्ष लाभार्थी मदत
२०१२-१३ २२६० २ कोटी ९४ लाख
२०१३-१४ २३६२ ७ कोटी ४२ लाख
२०१४-१५ २०८४ १० कोटी ५९ लाख
२०१६ २२७५ ११ कोटी ३७ लाख
(जाने. ते जून)
बातम्या आणखी आहेत...