आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी प्लॅस्टिक कंपनीत करत होते काम, आज 130 इंग्रजी शाळांचे आहेत मालक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आगस्टिन एफ पिंटो. - Divya Marathi
आगस्टिन एफ पिंटो.
मुंबई- गुरूग्राम येथे 'रायन इंटरनॅशनल स्कूल'मध्ये 7 वर्षाच्या चिमुकल्याच्या खून झाल्यानंतर ही शाळेत चर्चेत आली आहे. रायन इंटरनॅशनल ग्रुप ऑफ इन्टिटयूशन्स (RIGI) या ग्रुपचा भाग असलेली ही शाळा देशातील TOP 10 शाळांपैकी एक आहे. या संस्थेची स्थापना आगस्टिन एफ पिंटो आणि त्यांची पत्नी ग्रेस पिंटो यांनी 30 ते 35 वर्षांपूर्वी केली. या शाळेचे सीईओ रायन पिंटो हे एका प्लॅस्टिक कंपनी काम करत होते. ते अब्जाधीश आहेत.
 
देशभरात आहेत या शाळेच्या 130 शाखा
- देशभरात रायन इंटरनॅशनल ग्रुप ऑफ इन्टिटयूशन्स (RIGI) च्या 130 शाळा आहेत. 
- यात 18 हजार जण फॅक्लटी म्हणून काम करतात. हे शिक्षक 2 लाख 70 हजार मुलांना शिक्षण देतात. आखाती देशात या ग्रुपच्या 5 शाळा आहेत.
- या शाळांमधून दरवर्षी 30 हजार विद्यार्थी बाहेर पडतात. दरवर्षी हा ग्रुप 4 ते 5 नव्या शाळा सुरु करतो.

प्लॅस्टिक कंपनीत काम करत होते पिंटो
- कर्नाटकातील मंगळूर येथे जन्म झालेले आगस्टिन एफ पिंटो यांनी चेन्नईतील लॉयला कॉलेज ऑफ इकोनॉमिक्समधून पदवी संपादन केली आहे. 
- ते 40 वर्षापुर्वी कामाच्या शोधात मुंबईत आले. त्यानंतर ते एका प्लॅस्टिकच्या कंपनीत काम करु लागले.
- काही वर्षांनी ही कंपनी बंद झाली आणि ते बेरोजगार झाले. त्यांच्या एका मित्राच्या शिफारशीवरुन त्यांना मालाड येथे एका कंपनीत शिक्षकाची नोकरी मिळाली.
- तिथे शिकवत असताना त्यांची भेट गणिताच्या शिक्षिका ग्रेस एलबुबर्क यांच्याशी झाले ते ग्रेस यांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी 1974 मध्ये लग्न केले.
 
फक्त 10 हजारात खोलली पहिली शाळा
- त्यानंतर 1976 मध्ये दोघांनी फक्त 10 हजार रुपयात बोरिवलीत शाळा सुरु केली. पण ते अयशस्वी ठरले आणि त्यांना ही शाळा बंद करावी लागली.
- त्यानंतर 1983 मध्ये त्यांनी बोरिवलीतच सेंट जेवियर्स हायस्कूल नावाचे हे विद्यालय सुरु केले. त्यानंतर त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही.
- ग्रेस एलबुबर्क या आता ग्रेस पिंटो म्हणून ओळखल्या जातात. त्या समुहाच्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. या समुह कॉर्पोरेट पध्दतीने काम करतो.
- काही दिवसांपूर्वी ग्रेस पिंटो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यांना एक मुलगा असून त्याचे नाव रेयान पिंटो आहे.
- रेयान समुहाचे एक्झिक्यूटिव्ह ऑफिसर असलेले रेयान यांनी लंडनमध्ये बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. 
- रेयानच्या दोन बहिणी स्नेहल आणि सोनल पिंटो या शिक्षण क्षेत्रात आहेत आणि कुटुंबाच्या व्यवसायातच आहेत. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...