आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबादच्या राजाची नात होती संजय दत्तची Ex वाइफ; सध्या या कारणामुळे चर्चेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- माजी टेनिसपटू लिएंडर पेस याच्यासोबत तब्बल 8 वर्षे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहिल्यानंतर मॉडेल रिया पिल्लई कौंटुबीक हिंसाचारामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रिया ही बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची एक्स वाईफ आहे. ‍लिएंडर पेसकडून एक कोटी रुपये नुकसान भरपाई अपेक्षित आहे. मात्र, तिच्याकडून याचिका दाखल करताना एक चूक झाली. एक कोटी ही रक्कम लिहिताना तिच्याकडून चुकून एक शुन्य कमी लिहिला गेला. त्यामुळे हा दावा 10 लाख रुपयांचा झाला आहे.

रिया आहे हैदराबादच्या महाराजाची नात...
-संजय दत्तची एक्स वाईफ रिया पेस ही हैदराबादचे महाराजा नरसिंहगिर धनराजगिर ज्ञान बहादुर यांची नात आहे.
- रियाची आजी जुबैदा हिने देशातील पहिला बोलपट 'आलम-आरा' यात मुख्य अभिनेत्रीची भूमिका केली होती.
- रियाच्या वडिलांचे नाव रेमंड पिल्लई आणि आई दुर्रेश्वर धनराजगिर असे आहे.

एक झिरोने बदलून टाकला रियाचा खेळ..
- संजय दत्त याच्याशी काडीमोड घेतल्यानंतर रिया आणि लिएंडर पेस तब्बल आठ वर्षे लिव्ह इनमध्ये हेोते. नंतर दोघांनी लग्न केले. दोघांना एक 10 वर्षाच्या मुलगी आहे.
- नंतर ‍रियाने पेसविरोधात कोर्टात धाव घेतली होती.
- पेस हा एक बेजबाबदार वडील असल्याचा आरोप रियाने केला आहे.
- पेसकडून नुकसान भरपाई म्हणून एक कोटी रुपये अपेक्षित होते.

सध्या काय करतेय रिया...?
- रिया सध्या अध्यात्मात रमली आहे.
- रियाने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, अॅक्टिंगमध्ये तिला आता रस राहिला नाही. मुलगी हेच तिचे जग आहे.

अशी केली होती संजय दत्तच्या आयुष्यात एंट्री
- 1987 मध्ये संजय दत्त याने रिचा शर्मा हिच्याशी संसार थाटला होता. मात्र, रिचाचे कॅन्सरने 1996 मध्ये निधन झाले. - रिचापासून संजयला एक मुलगी आहे. त्रिशाला तिचे नाव. ती सध्या अमेरिकेत आहे.
- रिचा गेल्यानंतर संजयच्या आयुष्यात मॉडेल रिया पिल्लईने एंट्री केली.
- संजय दत्त आणि रिया हे आधीपासून चांगले मित्र होते.
- सन 1998 मध्ये संजय आणि रिया विवाहबद्ध झाले. संजय दत्तची ही दुसरी पत्नी होती. परंतु हे नाते फार काही दिवस टिकले नाही.

संजय- रिया असे झाले विभक्त...
- रियासोबत लग्न केल्यानंतर संजयने 7 सिनेमे साइन केले. तो शूटिंगमध्येच जास्त बिझी होता.
- त्यामुळे अवघ्या एका वर्षात रिया आणि संजयमध्ये खटके उडायला लागले.
- दोघे विभक्त राहू लागले. घटस्फोटासाठी त्यांनी अर्ज केला.
- तरी देखील रिया आपले शॉपिंग आणि हॉटेलचे बिल्स संजयकडे पाठवत होती.
- सन 2005 मध्ये रिया आणि संजय कायमचे विभक्त झाले.

एका सिनेमात झळकली होती रिया...
- रियाचे वडील बिझनेसमन असून आई डॉक्टर आहे.
- हिंदी सिनेमा "कॉर्पोरेट"मध्ये रिया दिसली होती.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून रिया पिल्लईचे निवडक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...