आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interesting Facts About Rajendra Sadashiv Nikhalje AKA Chota Rajan

छोटा राजन होता नर्सच्‍या प्रेमात, कसा झाला अंडरवर्ल्‍ड डॉन ? वाचा रंजक कहानी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सातारा जिल्‍ह्यातील गिरणी (ता. फलटण) येथील निकाळजे कुटुंब. संसाराचा गाडा गरिबीच्‍या दृष्‍टचक्रात फसलेला. पोटाची खळगी भरण्‍यासाठी हे कुटुंब मुंबईत आले. कुटुंबप्रमुख असलेल्‍या सदाशिव निकाळजे यांना पालिकेत सफाई कामगार म्‍हणून काम मिळाले. पुढे चतुर्थश्रेणी कर्मचारी म्‍हणून ते कायम झाले. 1956 मध्‍ये त्‍यांना एक मुलगा झाला. त्‍यांनी त्‍याचे नाव राजेंद्र ठेवले. पुढे हाच राजेंद्र निकाळजे छोटा राजन म्‍हणून कुप्रसिद्ध झाला. त्‍याला इंडोनेशियातील बाली येथे इंटरपोलने अटक केली. त्‍या अनुषंगाने divyamarathi. com सांगणार आहे सामान्‍य कुटुंबातील मुलगा ते अंडरवर्ल्‍ड डॉन हा त्‍याचा जीवनप्रवास....
छोटा राजन पडला होता नर्सच्‍या प्रेमात
छोटा राजन विवाहित असून, त्‍याच्‍या पत्‍नीचे नाव सुजाता आहे. या दाम्‍पत्‍याला अनिता, माला आणि पंकजा या तीन मुलीसुद्धा आहे. पण, स्‍त्रीलंपट असलेला छोटा खासगी आयुष्य एखाद्या सिनेमातील कथेला साजेसे असेच आहे. कधीकाळी गुन्हेगारी जगतात स्वत:चे समांतर साम्राज्य तयार करणारा छोटा राजन चक्क एका नर्सच्या प्रेमात पडला होता. छोटा राजनचा कधीकाळचा निकटचा साथीदार संतोष शेट्टीने याबाबत पोलिसांकडे महत्त्वाची माहिती दिली होती.
पुढील स्‍लाइडवर वाचा, लहापनापासूनच गुन्‍हेगारी प्रवृत्‍तीचा...