आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिंवतपणी वडिलांनी केले होते अंत्यसंस्कार, तृतीयपंथीने करून दाखवले हे मोठे काम...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आज आम्ही आपल्यासोबत मुंबईत राहाणार्‍या एका ट्रान्सजेंडरशी ओळख करुन देणार आहोत. गौरी सावंत असे तिचे नाव. गौरी मागील अनेक वर्षांपासून निराधार तृतीयपंथींच्या (किन्नर) हिताचे काम करते आहे. गौरी काही दिवसांपूर्वी टीव्ही शो 'कौन बनेगा करोडपति'मध्ये सहभागी झाली होती. गौरीने आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तिच्या वडिलांनी तिचे जिंवतपणीच अंत्यसंस्कार केले होते.

विक्सच्या जाहिरातीत झळकली होती गौरी...
- काही महिन्यांपूर्वी गौरी, विक्सच्या एका जाहिरातीत झळकली होती. जाहिरातीत ती एका सहा वर्षांच्या मुलीसोबत दिसली होती.
- मुलीला एकटे सोडून तिचे पालक जग सोडून निघून गेले आहेत. त्या मुलीला 'मम्मी' (गौरी सावंत) हिने दत्तक घेतल्याचे जाहिरातीत दाखवले आहे. 

कोण आहे गौरी सावंत?
- 36 वर्षीय ट्रान्सजेंडर गौरीचा जन्म मुंबईतील दादर येथील एका मराठी फॅमिलीत झाला.
- आई- वडिलांनी त्याचे नाव गणेश नंदन असे ठेवले.
- गणेशचे वडील सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) होते.
- गणेश काही वर्षांपूर्वी व्हेजिनोप्लास्टी करून गौरी बनला होता.
-  गौरीने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, घरातून पळून आल्यानंतर तिच्या वडिलांनी तिचे अंत्य संस्कार केले होते.
- घरून पळून आलेल्या ट्रान्सजेंडर्ससाठी गौरीने मालाडमधील मलवाणी भागात 'सखी चार चौघी' केंद्र सुरु केले आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... गौरी सावंतचे निवडक फोटो..
बातम्या आणखी आहेत...