आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोटा राजन होता नर्सच्‍या प्रेमात, कसा बनला अंडरवर्ल्‍ड डॉन? वाचा लव्हस्टोरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बनावट पासपोर्ट प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजन याच्यासह चौघांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज (मंगळवारी) 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच या सर्वांना प्रत्येकी 15 हजार रूपयांचा दंडही ठोठाविण्यात आला आहे. या अनुषंगाने आम्ही आपल्यासाठी छोटा राजनशी संबंधित रंजक कहाणी घेऊन आलो आहे.

सातारा जिल्‍ह्यातील गिरणी (ता.फलटण) येथील निकाळजे कुटुंब. संसाराचा गाडा गरिबीच्‍या दृष्‍टचक्रात फसलेला. पोटाची खळगी भरण्‍यासाठी हे कुटुंब मुंबईत आले.

कुटुंबप्रमुख असलेल्‍या सदाशिव निकाळजे यांना पालिकेत सफाई कामगार म्‍हणून काम मिळाले. पुढे चतुर्थश्रेणी कर्मचारी म्‍हणून ते कायम झाले. 1956 मध्‍ये त्‍यांना एक मुलगा झाला. त्‍यांनी त्‍याचे नाव राजेंद्र ठेवले. पुढे हाच राजेंद्र निकाळजे छोटा राजन म्‍हणून कुप्रसिद्ध झाला.
आज आम्ही आपल्याला सांगणार आहे, सामान्‍य कुटुंबातील मुलगा ते अंडरवर्ल्‍ड डॉन हा त्‍याचा जीवनप्रवास....

छोटा राजन होता नर्सच्‍या प्रेमात
छोटा राजन विवाहित असून, त्‍याच्‍या पत्‍नीचे नाव सुजाता आहे. या दाम्‍पत्‍याला अनिता, माला आणि पंकजा या तीन मुलीसुद्धा आहे. पण, स्‍त्रीलंपट असलेला छोटा राजनचे खासगी आयुष्य एखाद्या सिनेमातील कथेला साजेसे असेच आहे. कधीकाळी गुन्हेगारी जगतात स्वत:चे समांतर साम्राज्य तयार करणारा छोटा राजन चक्क एका नर्सच्या प्रेमात पडला होता. छोटा राजनचा कधीकाळचा निकटचा साथीदार संतोष शेट्टीने याबाबत पोलिसांकडे महत्त्वाची माहिती दिली होती.

पुढील स्‍लाइडवर वाचा, लहापनापासूनच गुन्‍हेगारी प्रवृत्‍तीचा..

हेही वाचा...

बनावट पासपोर्ट प्रकरण: छोटा राजनसह चौघांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...