आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे आहे जगामधील सर्वात बिझी एयरपोर्ट, प्रत्येक 75 सेकंदाला लॅंड होते एक फ्लाईट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई एयरपोर्टवरील रनवेचा टॉप एंगल व्यू... - Divya Marathi
मुंबई एयरपोर्टवरील रनवेचा टॉप एंगल व्यू...

मुंबई- फक्त एकच रनवे चालू असल्याने मुंबई एयरपोर्ट जगातील सर्वात व्यस्त एयरपोर्ट बनले आहे. मुंबई एयरपोर्टने गेल्या शुक्रवारी एक रनवेद्वारे 24 तासांत 969 विमाने टेक ऑफ आणि लॅंडिंग करण्याचा विश्वविक्रम नोंदवला आहे. येथे प्रत्येक 75 सेकंदाला एक फ्लाईट रनवे वर लॅंड होते. छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एयरपोर्टवरील टर्मिनल-2 देशातील सर्वात मोठे टर्मिनल आणि पहिले चार मजली व्हर्टिकल टर्मिनल आहे. मुंबईने तोडला आपलाच विक्रम....

 

- मुंबईतील आंतरराष्ट्रीय एयरपोर्ट लिमिटेड (एमआयएएल) चा प्रवक्त्याने सांगितले की, या नव्या कीर्तिमानासह आम्ही मुंबई एयरपोर्टवरून 935 विमानाचे टेक ऑफ आणि लँडिंग करण्याचा विक्रम मोडला आहे.
- मेगा सिटीज न्यूयॉर्क, लंडन, दुबई आणि दिल्लीमध्ये दोन किंवा अधिक रनवे आहेत. जे एकाच वेळी काम करत असतात. 
- मुंबईत सुद्धा दोन रनवे आहेत मात्र, एक दुस-याना क्रॉस करतात. त्यामुळे केवळ एक रनवेचा उपयोग केला जात आहे. 
- तांत्रिकदृष्ट्या मुंबईतील एयरपोर्ट सिंगल एयरपोर्ट श्रेणीत मोडते. त्यामुळे येथील रन वे कायम व्यस्त राहते. 
- मुंबईत दररोज सामान्यपणे 900 हून अधिक विमानांचे संचालन होते. एमआयएएलचे अधिका-याचे म्हणणे आहे की, आम्हाला आशा आहे की लवकरच दररोज 1000 चा आकडा पार करेल.

 

काय आहे या एयरपोर्टमध्ये खास-

 

- याचा छत 42 मीटर ऊंच आहे, जो 20 हजार टन स्टीलने बनवला आहे. टर्मिनलमध्ये 192 चेक प्वाईंट, 60 इमीग्रेशन काउंटर आणि 135 एग्जिट प्वाईंट आहे. 
- याच्या कॅम्पसमध्ये 5 हजार कारसाठी मल्टिपल पार्किंगची सुविधा आहे. येथे बिझी शेड्यूलमध्ये प्रत्येक तासाला 42 विमान येऊ-जाऊ शकतात. 
- दिल्लीतील मशहूर इंदिरा गांधी इंटरनॅशनल एयरपोर्ट दिल्ली टर्मिनल-3 पेक्षा अधिक जबरदस्त आहे.
- याची क्षमता वार्षिक चार कोटी प्रवाशांना सुविधा देण्याची आहे. त्याला जीव्हीके ग्रुपने तयार केले आहे. 

 

100 विमान होऊ शकतात पार्क-

 

- या टर्मिनलवर 4 कोटी प्रवाशांची क्षमता आहे आणि येथे 100 विमान पार्क होऊ शकतात.
- 10 हजार प्रवाशी पीक ऑवर्समध्ये चेक इन व चेक आउट करू शकतात. हे टर्मिनल 4.39 लाख वर्ग मीटरमध्ये पसरले आहे.
- तर लंडनमधील हिथ्रो एयरपोर्ट 3.53 लाख वर्ग मीटर आणि सिंगापूरमधील चांगी एयरपोर्ट 3.80 लाख वर्ग मीटरमध्ये पसरले आहे.

 

हॉटेलची सुविधा उपलब्ध-

 

- येथे 16 लाउंज, 11 हजार सीट्स आणि 10 लगेज ट्रान्सफर बेल्ट, 48 एस्केलेटर्स, 73 लिफ्ट, 25 लिंक ब्रिज आणि 52 बोर्डिंग ब्रीज आहेत.
- सोबतच, एक डे हॉटेल आणि एका ट्रान्जिट हॉटेलची सुविधा आहेत. 

 

आर्ट गॅलरी सुद्धा उपलबद्ध- 

 

- एयरपोर्टवर पोहचल्यानंतर वेळ वाचविण्यासाठी 6 लेन एलिवेटेड रोडद्वारे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला टर्मिनल 2 ला जोडले आहे.
- एक्स आकारात बनलेल्या या टर्मिनलमध्ये तीन किमी लांब आर्ट गॅलरी सुद्धा आहे. यात देशातील कल्चर आणि आर्टशी संबंधित सात हजाराहून अधिक पेंटिंग्स आहेत. 

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मुंबई एयरपोर्टच्या आतील आणखी काही फोटोज ...

बातम्या आणखी आहेत...