आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interesting Facts And Photograph Of Maharashtra Election Campaign

तोफा थंडावल्या, महाराष्ट्र विधानसभेचा असा राहिला प्रचार, पाहा छायाचित्रे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गेले तीन आठवडे राज्यभर उडालेला विधानसभा निवडणूक प्रचाराचा धुरळा अखेर सोमवारी सायंकाळी खाली बसला. आता भेटीगाठी, गुप्त बैठका याचे पेव फुटले आहे. मतदारांना पैसे, भेटवस्तू आणि दारू वाटण्याचे प्रकार रोखण्यासाठी पोलीस व निवडणूक आयोगाची भरारी पथकांची राज्यभर करडी नजर आहे.
उद्या 15 ऑक्टोबरला राज्यातील सर्व 288 मतदारसंघांत एकाच टप्प्यात मतदान होत आहे. राज्यातील आठ कोटी 35 लाख मतदार 4119 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला करतील. गेले तीन आठवडे कधी प्रचारसभा, कधी रोड शो तर कुठे पदयात्रा, कुठे बाईक रॅली... कडक उन्हाची पर्वा न करता राज्यभरात प्रचाराचा धडाका सुरू होता. यंदा प्रथमच प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवीत असल्याने प्रचाराची ही रणधुमाळी शिगेला पोहोचली होती.
मोदी पूर्णवेळ प्रचारक- 25 वर्षांची युती तोडणार्‍या भाजपला उमेदवारच सापडेनात तेव्हा त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट मंत्री, आमदारांना आयात केले आणि उभे केले. राज्यातील भाजप नेत्यांची ‘लायकी’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओळखली आणि त्यांनी दिल्लीतून बॅग भरून महाराष्ट्रातच मुक्काम ठोकला. भाजपने मोदी यांना ‘पूर्णवेळ प्रचारक’ म्हणूनच महाराष्ट्रात उतरवले. त्यांनी 10 दिवसांत तब्बल 27 सभा घेतल्या. पंतप्रधानपदावरील व्यक्तींनी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षासाठी एवढ्या सभा घेण्याचे हे पहिलेच उदाहरण ठरले आहे. भाजप एवढ्यावरच थांबला नाही तर केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या फौजासह गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, गोव्याचे मनोहर पर्रिकर, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, नवज्योतसिंग सिद्धू यांनाही महाराष्ट्रात प्रचार करण्यास भाग पाडले.
युती तुटल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचाही आत्मविश्वास दुणावला- राज्यात महायुती विरूद्ध आघाडी अशी लढाई झाली तरी महायुती 200 जागा जिंकेल असेच सर्वत्र चित्र होते. मात्र, जागावाटपांवरून भाजप-सेनेची महायुती तुटली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जीवात जीव आला. राष्ट्रवादीने युती तुटल्यानंतर तासाभराच्या आता आघाडी तुटल्याचे जाहीर केले. सर्वच पक्ष स्वतंत्र लढत असल्याने या वातावरण आपण चांगल्या जिंकू शकतू असा आत्मविश्वास काँग्रेस-राष्ट्रवादीला आला. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी केवळ 60-70 जागा जिंकेल तेथे सांगणारे आता काँग्रेस, राष्ट्रवादी प्रत्येकी 50-60 जागा जिंकू शकतात असे बोलू लागले आहेत. त्यामुळे आघाडीतील दोन्ही पक्षांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
उद्धव ठाकरेंचा राज्यभरात झंझावात- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या 15 दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत सुमारे 50 सभा घेतल्या. भाजपने कसा धोका दिला हे उद्धव राज्यातील जनतेपर्यंत पोहचवू शकले. त्यामुळे राज्यात शिवसेनेला सहानुभूती मिळत गेली व त्याचे झंझावातात परिवर्तन झाले. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारावर प्रहार केलाच पण भाजपवर हल्लाबोल करताना मोदी-शहांना धक्का दिला. महाराष्ट्राचे हित जपणारा शिवसेना हाच एकमेव पक्ष असल्याचे त्यांनी जाणीवपूर्वक मराठा मनांवर बिंबावत प्रादेशिक अस्मितेला हात घातला. त्याचा फायदा सेनेला होणार आहे. आदित्य ठाकरे यांनीही 35 सभा आणि रोड शो करून महाराष्ट्र पिंजून काढला.

उद्या मतदान
- एकूण जागा - 288
- उमेदवार - 4119
- मतदार - 8 कोटी 35 लाख 38 हजार 114
पक्ष लढवत असलेल्या जागा

शिवसेना - 282
कॉंग्रेस - 287
राष्ट्रवादी - 278
भाजप व मित्रपक्ष- 280
मनसे - 219

थोडक्यात महत्त्वाचे
- सर्वाधिक 39 उमेदवार दक्षिण नांदेड मतदारसंघात
- अकोले व गुहागरमध्ये केवळ 5 उमेदवार
- राज्यभरात 91 हजार 376 मतदान केंद्रे
- 5 लाख 84 हजार कर्मचारी तैनात.
पुढे छायाचित्राच्या माध्यमातून पाहा, यंदा महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार कसा होता व कसा राहिला....