आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Interesting Facts Regarding IPS & Former Mumbai Police Chief Rakesh Maria

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या IPS शी सामना होताच संजय दत्त हमसून हमसून रडला, पोपटासारखा बोलू लागला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिना मर्डर केसची तपासणी करीत असलेले मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारिया यांची बढतीच्या नावाखाली उचलबांगडी करण्यात आली आहे. इन्व्हेस्टिगेशन स्किलसाठी मारिया ओळखले जातात. त्यांना मुंबईचे सुपरकॉप असेही म्हटले जाते. 1993 बॉम्बस्फोटांमध्ये अभिनेता संजय दत्त याच्याकडून गुपित माहिती काढण्यापासून दहशतवादी याकूब आणि अजमल कसाब यांची पोलिस चौकशी करण्यापर्यंत मारिया यांनी अनेक मोठमोठी प्रकरणे हाताळली. मारिया यांच्यासमोर आल्यावर संजय दत्त तर अगदी हमसून हमसून रडला होता.
का रडला होता संजय दत्त
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा तपास करण्याची जबाबदारी राकेश मारिया यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांनी संजय दत्तला AK47 आणि इतर शस्त्रे ठेवल्याप्रकरणी अटक केली होती. संजयचे इंटरॉगेशन सुरु झाले तर तो पोलिसांची दिशाभुल करीत होता. त्यानंतर मारिया इंटरॉगेशन रुममध्ये गेले. त्यांना बघून संजय प्रचंड घाबरला. त्यानंतर मारिया यांनी चौकशी केली तेव्हा संजय हमसून हमसून रडू लागला. ही शस्त्रे कुणी दिली, आपल्याकडे कशी आली, कुठे लपवली होती, अशी सगळी खरी माहिती त्याने मारिया यांना दिली.
पुढील स्लाईडवर वाचा, राकेश मारिया यांच्याशी निगडित काही खास बाबी....