आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यांचे आजोबा कापायचे नेहरु, माऊंटबेटनचे केस, यांच्या नावावरही नोंदवला गेलाय विक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सायली भगत सोबत जावेद हबीब. - Divya Marathi
सायली भगत सोबत जावेद हबीब.
मुंबई- हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांच्या नावावर एका दिवसात 410 जणांचा केस कापल्याचा विक्रम आहे. त्यांच्या 3 पिढया हेअर स्टायलिस्ट होत्या. त्यांना हद्यविकाराचा झटका आल्याने यमुनानगर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

नेहरु आणि माऊंटबेटन होते जावेद यांच्या आजोबांचे ग्राहक
- जावेद हबीब यांची तिसरी पिढी या व्यवसायाशी निगडित आहे. त्यांचे आजोबा नाजिर अहमद हे आपल्या काळातील प्रसिध्द हेअर स्टायलिस्ट होते.
- त्यांच्या ग्राहकांमध्ये ब्रिटीशांचे शेवटचे व्हाईसरॉय लार्ड माउंटबेटन आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा समावेश होता. 
 
लंडनमध्ये शिकले जावेद हबीब
- जावेद हबीब यांनी जेएनयूमधून फ्रेंच साहित्यात पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. 
- लंडन येथील मौरिस स्कूल ऑफ हेयर ड्रेसिंग आणि लंडन स्कूल ऑफ फॅशनमधून आर्ट अॅण्ड सायन्स ऑफ हेयर स्टाइलिंग अॅन्ड ग्रूमिंग मध्ये दोन वर्षांचा डिप्लोमा केला आहे.
- भारतात हेअर कलरिंगला लोकप्रिय करण्यात जावेद हबीब याचा मोलाचा वाटा आहे. त्यांची लोकप्रियता पाहून एका शॅम्पू कंपनीने त्यांना ब्रँन्ड अॅम्बेसिडर बनवले होते.
 
नावावर नोंदवले आहेत अनेक विक्रम
- जावेद यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंदविण्यात आले आहे. त्यांच्या नावावर एका दिवसात नॉनस्टॉप 410 हेअर कट केल्याचा विक्रम आहे. 
- देशभरात जावेद हबीब यांचे 200 सलून आहेत. त्यात जवळपास 700 हेअर स्टायलिस्ट काम करतात. ते 30 ट्राइकोलॉजी शाळाही चालवतात.
- भारताशिवाय नेपाळ आणि मलेशियातही त्यांच्या संस्था आहेत.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...