आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉयलेटसाठी या आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डरला करावी लागली भटकंती, स्वच्छ भारत अभियनाची पोलखोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आशिया खंडातील सर्वात मोठा स्लम एरिया म्हणून ओळखला जाणार्‍या धारावीत एका आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डरची टॉयलेटसाठी चांगलीच गोची झाली. मार्टिन फोर्ड हा धारावीत एका शाळेत कार्यक्रमात आला होता. जवळपास अर्धा तास त्याला सार्वजनिक टॉयलेटसाठी भटकंती करावी लागली. अखेर त्याने एका घराचा दरवाजा ठोठावला आणि तो मोकळा झाला.  

मार्टिन फोर्डने दिली धारावीतील एका शाळेला भेट... 
- बॉडी बिल्‍डर मार्टिन फोर्ड याने धारावीतील एका शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारल्या.  
- शाळेतून निघाल्यानंतर फोर्डला टॉयलेटला जायचे होते. जवळपास पब्लिक टॉयलेट आहे का?  असा प्रश्न फोर्ड याने आयोजकांना केला. पण शाळेच्या परिसरात एकही सार्वजनिक शौचालय नाही असे उत्तर ‍मिळाले.    
- मात्र, प्रेशर वाढल्याने फोर्ड स्वत: कुठे सार्वजनिक टॉयलेट दिसते का? हे पाहाण्यासाठी धारावीतील गल्लीबोळात फिरला. आयोजक आणि शाळेचे विद्यार्थीही त्याच्यासोबत होते. 
- फोर्डला कुठेच टॉयलेट दिसले नाही. अखेर त्याने एका घराचा दरवाजा ठोठावला आणि तो मोकळा झाला.

कधीकाळी सडपातळ होता हा पैलवान... 
- फोर्ड कधीकाळी सडपातळ होता. मात्र, अथक परिश्रम आणि निश्चयाने तो आज आंतरराष्ट्रीय कीर्तीचा बॉडीबिल्डर बनला आहे. 
- फोर्डने मुंबई महापालिकेने सुरु केलेल्या स्वच्छता अभियानाची अप्रत्यक्षरित्या पोलखोलच केली आहे.  
- एका सर्व्हेनुसार, मुंबईतील स्‍लम भागातील 20 टक्के घरांमध्ये टॉयलेट नाही.  
- स्‍वच्‍छ भारत अभियानाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, 30 लोकांमागे एक टॉयलेट सीट असणे आवश्यक आहे. 
- मुंबईत स्‍लम भागात राहाणार्‍या लोकसंख्येनुसार 1.36 टॉयलेट सीट्स गरजेच्या आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, मार्टिन फोर्ड यांचे निवडक फोटोज.. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...