आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5-6 हजारांत खरेदी केल्या जातात अल्पवयीन मुली, मुंबई-पुण्यातही तस्करांची टोळी सक्रीय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मागील वर्षी तीन वर्षीय चिमुरडीच्या अपहरण प्रकरणातून एक धक्कादायक माहिती उजेडात आली होती. ती म्हणजे, पश्चिम बंगाल ते राजस्थान बॉर्डरपर्यंत मोठ्या प्रमाणात मानवी तस्करी केली जाते. इतकचे नव्हे तर मुंबई-पुण्यात तस्करांची साखळी असल्याचे अटक करण्यात आलेल्या नंदिनी रॉय हिने पोलिसांना सांगितले होते.

पोलिसांनी नंदिनीची कसून चौकशी केली होती. जोधपूरमध्ये एका बंद खोलीत पोलिसांना दोन अल्पवयीन मुली सापडल्या होते. त्यामुळे देशात मोठे सेक्स रॅकेट सुरु असल्याचा संशय पोलिसांना होता.

सेक्स रॅकेटचा धागा थेट वेस्ट बंगालपर्यंत...
या प्रकरणाचा धागा थेट बंगालमधील लक्ष्मीपूरशी जोडण्यात आला होता. हे गाव एका नदीच्या काठावर असून तेथून बांगलादेश अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर आहे. येथून संपूर्ण देशात अल्पवयीन मुलींची तस्करी केली जाते, अशी धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली होती.

8 महिन्यांत कमवले 35 लाख रुपये...
- नंदिनीने पोलिसांना सांगितले होते की, लक्ष्मीपूरमधून मोठ्याप्रमाणात मानवी तस्करी केली जाते. बांगलादेशातून 5 ते 7 हजारांत मुली खरेदी केल्या जातात. नंतर बॉर्डरवर तैनात जवानांना चिरीमिरी देऊन कोलकात्यात आणल्या जातात. नंतर त्यांना देहविक्री व्यवसायात ढकलण्यात येते. नंदिनीने यातून 8 महिन्यांत 35 लाख रुपये कमवले होते.
- मानवी तस्करी करणार्‍या टोळीचा म्होरक्या सुजॉय विश्वास याला बांगलादेशच्या बॉर्डर अटक केले होते. नंतर त्याला जोधपूरला आणले होते.
- बॅंक खात्यांची चौकशी केली जात आहे. मुंबई, पुण्यासह देशातील अनेक शहरात देहविक्री व्यवसायातील अनेक मुलींची सुटका करण्‍याचा प्रयत्न केला होता.
- नंदिनीच्या घरावर पोलिसांनी छापेमारी केली होती. त्यात बनावट आयडी आणि बँकेत रुपये डिपॉझिट केल्याच्या पावत्या सापडल्या होत्या.
- जयपूर, मुंबई, पुणे आदी शहरातून हे रुपये डिपॉझिट करण्यात आले होते. विड्रा बंगालमधील विविध एटीएममधून करण्‍यात आले आहे.

पुढील स्लाइड्सवरील इन्फोग्राफिक्समधून वाचा, पश्चिम बंगाल ते राजस्थानात असे चालत होते सेक्स रॅकेट.....
बातम्या आणखी आहेत...