आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक योग दिनानिमित्त मुंबईत विविध कार्यक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- २१ जून हा युनेस्कोने जागतिक योग दिवस म्हणून घोषित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या योग दिनाचे मुंबईत विविध संस्थांनी आयोजन केले आहे. या कार्यक्रमांमध्ये राजकीय नेते, चित्रपट अभिनेते आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित राहून योगा करणार आहेत.

"आय लव्ह मुंबई' आणि "द आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या वतीने हेल्थ गुरू मिकी मेहता आणि शायना एनसी यांनी मरिन ड्राइव्ह येथे योग दिवसाचे आयोजन केले आहे. गिरगाव चौपाटी ते नरिमन पॉइंट परिसरात सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सकाळी सात वाजता मरिन ड्राइव्ह येथे आयोजित योग दिन कार्यक्रमाला उपस्थित राहाणार आहेत.

तिन्ही सैन्यदलांच्या वेगवेगळ्या युनिट्समध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त योगाभ्यास आयोजित करण्यात आला आहे. भारतीय नौदलातील विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराटच्या फ्लाईटडेकवर नौसैनिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योग दिवस साजरा केला जाणार आहे. खासदार आठवले या कार्यक्रमाला उपस्थित राहाणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...