आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलन: सरकारी कंत्राटांसाठी डोक्यावर बर्फ, जीभेवर साखर हवी -जयंत म्हैसकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पु.भा.भावे नगरी - नियोजन, अंमलबजावणी, पैसा आणि आपला चमू यांची सुयोग्य सांगड घातली की, व्यवसायातील कोणत्याही गोष्टी सहज सोप्या होतात. पण त्यात नियोजन ही व्यवसायाच्या यशस्वीतेची गुरुकिल्ली आहे, असे ज्येष्ठ उद्योजक जयंत म्हैसकर यांनी सांगितले. साहित्य संमेलनात दूरदर्शनचे वृत्त निवेदक अरविंद विंझे आणि शैलेश पेठे यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत म्हैसकर यांनी त्यांच्या उद्योजकतेचा प्रवास सर्वांसमोर उलगडला.
 

यावेळी म्हैसकर म्हणाले की, शाळा ही कुटुंबासारखी असते. याकुटुंबात जे काही शिकायला मिळते, त्यावरच आपले भविष्य अवलंबून असते. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रीत करायला हवे. व्यवसायाचे बाळकडू वडिलांकडून मिळाल्याचे ते म्हणाले. व्यवसाय करायचा हे ठरलेलं होतं तरी कोणता व्यवसाय करायचा हे निश्चित नव्हते. वडिलांकडून 50 हजारांचे भांडवल घेऊन त्यांनी व्हिडीओ कॅसेटचा व्यवसाय केला. त्यात नफा कमावत वडिलांचे भांडवल परत केले. 2002 मध्ये त्यांनी एमइपी इन्फ्राची स्थापना केली. कर्ज मिळवताना अडचणी आल्याचे ते सांगतात. रस्ते बांधणी व देखभाल ही नवी संकल्पना असल्याने थोडा त्रास झाला, पण योग्य सादरीकरण करता आले तर यश मिळते असेही म्हैसकर म्हणाले. 
 
डोक्यावर बर्फ, जीभेवर साखर
पायाभूत क्षेत्रात सरकारची कंत्राटे मिळवताना डोक्यावर बर्फ आणि जीभेवर साखर हे सूत्र वापरल्याचे म्हैसकर म्हणाले. थंड डोक्याने एखादी गोष्ट पटवून दिली की, ती राज्यकर्त्यांना पटते हे कळाल्याचेही ते म्हणाले. 
 
टिमवर्क गरजेचे 
व्यवसाय करताना टीमवर्क अत्यंत गरजेचे असल्याचे ते सांगतात. तुम्ही सहकाऱ्यांना ठरवून दिलेली जबाबदारी ते योग्यप्रकार पार पाडतात असेही म्हैसकर यांनी सांगितले. 
 
पायाभूत सुविधावरील भर दीर्घकाळात देशाला फायद्याचा
गेल्या दोन वर्षात सरकारने पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर भर दिला असून तयाचा देशाला दीर्घकाळात नक्कीच फायदा होईल असा विश्वास प्रसिद्ध उद्योजक आणि एम इ पी इन्फ्राचे  उपाध्यक्ष जयंत म्हैसकर यांनी प्रकट मुलाखतीत व्यक्त केला. परदेशातील रस्ते भारतात बांधले जाऊ शकतात आणि याचे चित्र भविष्यात दिसेल. सुयोग्य रस्ते आणि देखभाली पायाभूत क्षेत्राचा विकास होईल. पण त्याचा योग्य वापर करण्याची जनतेची मानसिकता हवी असेही ते म्हणाले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...