आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आरोपांमुळे आत्‍महत्‍या करणार होते,\' वाचा राधे माँची विशेष मुलाखत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भोंदू धर्मगुरू राधे माँ हिच्‍यावर अश्ल‍िलता पसरवणे, हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करणे, जिवे मारणी धमकी देणे असे आरोप झालेत. या आरोपांमुळे व्‍यथित होऊन आपण आत्‍महत्‍या करणार होतो, अशी खळबळजक माहिती खद्द राधे माँनेच एका इंग्रजी वृत्‍तपत्राला दिलेल्‍या मुलाखतीत दिली. तसेच हा आपल्‍याला बदनाम करण्‍याचा डाव असल्‍याचेही तिने म्‍हटले. divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी या मुलाखतीचा हा संपादित अंश...
- तुम्‍ही सुखविंदर कौरपासून राधे माँ कशा झाल्यात ?
वयाच्‍या 17 व्‍या वर्षीच माझे लग्‍न झाले. दरम्‍यान, दोन मुली झाल्‍यात. नंतर काही दिवसानंतर माझे पती आम्‍हाला सोडून व्‍यवसायासाठी बाहेर गेले. मुली आणि सासरकडील व्‍यक्‍तींची जबाबदारी माझ्यावरच आली. त्‍यामुळे शिलाई काम करावे लागले. लहापनापासूनच मला संगीताचा आवड होती. त्‍यामुळे कुठलीही मधुर धुन कानावर पडली तर मी तल्‍लीन होऊन जाई. हेच पाहून माझ्या सासरकडील व्‍यक्‍तींना वाटले की, माझ्यात काही दैवी शक्‍ती आहे. त्‍यातून ते मला माझ्या गुरूकडे घेऊन गेले. त्‍यांनी मला दिव्‍यशक्‍तीचा मार्ग दाखवला आणि त्‍यांनीच राधे माँ असे नाव दिले.

पुढील स्‍लाइडवर वाचा, तुम्‍ही देव आहात असा दावा कधी केला का ?