आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Investigate Bhujbal,wastawade Hawala Racket : Somyya

भुजबळ, वस्तावडे हवाला रॅकेट प्रकरणाची चौकशी करा : किरीट सोमय्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्या गैरव्यवहारात साथ देणा-या अनिल वस्तावडे याच्या मदतीने भुजबळ कुटुंबाला हवालाच्या माध्यमातून सुमारे 100 कोटी रुपये मिळाल्याचे बँकेच्या व्यवहारावरून स्पष्ट होत आहे. या प्रकरणी कृपाशंकर सिंह यांचाही समावेश असल्याचे निदर्शनास आल्याने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्याकडे केली. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडे तक्रार दाखल केली असून राज्य सरकारनेही याची दखल घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करावा तसेच याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
इंडोनेशियातील जकार्ता येथे पॅन पॅसिफिक हॉटेलमध्ये खासदार समीर भुजबळ, अंतिम तोतला, अनिल वस्तावडे आणि परेश पागे यांच्यात बैठक झाली होती, या बैठकीचा तपशील तपासण्यात यावा. मुंबई, दुबई, लंडन, सिंगापूरमार्गे इंडोनेशिया येथे हवालाद्वारे पैसे पाठवण्यात आले. हा व्यवहार 10 सप्टेंबर 2010 ते 9 जानेवारी 2011 दरम्यान झाल्याचे त्यांनी सांगितले. हा पैसा भुजबळ कुटुंबीयांनी खाणींमध्ये गुंतवला असून चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.