आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाषण पुराव्यावर संशय, मोपलवार यांना क्लीन चिट; सीडीत फेरफार असल्याचे मत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी पैसे लाटल्याचा गंभीर आरोप झालेले सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना चौकशी समितीने क्लीन िचट िदली आहे. यात पुरावा म्हणून दिलेल्या संभाषणाच्या सीडीबाबत समितीने संशय व्यक्त केला असून सीडीमध्ये फेरफार केला असल्याचा समितीला संशय आहे. तसा अहवाल सरकारला सादर करण्यात आला. मोपलवार यांच्यावर आरोप झाल्यानंतर सरकारने त्यांना समृद्धी महामार्गाच्या प्रमुखपदावरून हटवून चौकशी करण्याचा िनर्णय घेतला होता. समृद्धी महामार्ग इमारतीच्या बांधकामावरून सुरू होती सेटलमेंट : ठाण्यातील सतीश मांगले यांनी पुराव्यादाखल सादर केलेल्या सीडीमध्ये एका मध्यस्थामार्फत एका इमारतीच्या बांधकामावरून सेटलमेंट सुरू असल्याचे संभाषण होते. या संभाषणाच्या पहिल्या भागात मोपलवार आपल्या नातेवाईकांचा संदर्भ देत असून नातेवाइकांकडून आपण पैसे घेणार असल्याचे सातत्याने बोलत आहेत. त्यानंतरच्या भागात मात्र जमीन प्रकरणात १ कोटीची रक्कम हवी असल्याचे सांगत हे पैसे सरकारच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवायचे असल्याचे सांगताना मोपलवार दिसतात.


न्यायालयीन चौकशीची मागणी

मोपलवारांना क्लीन चिट देण्यासाठीच चाैकशी समितीची िनयुक्ती करण्यात आली होती. समृद्धी महामार्ग घोटाळा प्रकरण गुंतागुंतीचे असून मोपलवारांना वाचवण्याशिवाय पर्याय नव्हता. मोपलवार दोषी ठरले असते तर महत्त्वाच्या व्यक्ती अडचणीत अाल्या असत्या. त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करायला हवी, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

 

इमारतीच्या बांधकामावरून सुरू होती सेटलमेंट

ठाण्यातील सतीश मांगले यांनी पुराव्यादाखल सादर केलेल्या सीडीमध्ये एका मध्यस्थामार्फत एका इमारतीच्या बांधकामावरून सेटलमेंट सुरू असल्याचे संभाषण होते. या संभाषणाच्या पहिल्या भागात मोपलवार आपल्या नातेवाइकांचा संदर्भ देत असून नातेवाइकांकडून आपण पैसे घेणार असल्याचे सातत्याने बोलत आहेत. त्यानंतरच्या भागात मात्र जमीन प्रकरणात १ कोटीची रक्कम हवी असल्याचे सांगत हे पैसे सरकारच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवायचे असल्याचे सांगताना मोपलवार दिसतात.

 

वादग्रस्त कारकीर्द
मोपलवारांची कारकीर्द वादग्रस्त असूनही त्यांना काँग्रेस आघाडी सरकारच्या काळापासून महत्त्वाची पदे िमळाली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोकण विभागीय आयुक्त अशी पदे िमळालेल्या मोपलवारांना भाजप सरकार आल्यानंतरही मर्जीची खाती मिळाली.

 

न्यायालयीन चौकशीची मागणी
मोपलवारांना क्लीन चिट देण्यासाठीच चाैकशी समितीची िनयुक्ती करण्यात आली होती. समृद्धी महामार्ग घोटाळा प्रकरण गुंतागुंतीचे असून मोपलवारांना वाचवण्याशिवाय पर्याय नव्हता. मोपलवार दोषी ठरले असते तर महत्त्वाच्या व्यक्ती अडचणीत अाल्या असत्या. त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करायला हवी, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

 

अहवाल िनर्णायक नाही
मांगले यांनी रेकाॅर्ड केलेल्या मूळ सीडी समितीकडे नव्हत्या. वाहिन्यांकडून त्या मिळवल्या. यामुळे हा अहवाल िनर्णायक होऊ शकत नाही, असे मत चौकशी समितीमधील एका सदस्याने व्यक्त केले आहे.


काय होते ऑडीओ टेपमध्‍ये?
समृद्धी महामार्गाला विरोध करणा-या शेतक-यांच्‍या व्‍हॉट्सअप गृपवर मोपलवार यांची वादग्रस्‍त ऑडिओ क्लिप व्‍हायरल झाली होती. यामध्‍ये मोपलवार आणि एका जणात इमारतीच्‍या बांधकामावरुन सेटलमेंट सुरु असल्‍याचे शेतक-यांचे म्‍हणणे होते. मात्र ऑडिओ टेपमध्‍ये ज्‍या जमिनीबाबत चर्चा करण्‍यात आली. ती जमीन बोरीवलीतील आहे. मात्र समृद्धी महामार्ग बोरीवलीतून जातच नाही. त्‍यामुळे ही क्लिप अशा पद्धतीने एडीट करण्‍यात आली की, ती चर्चा समृद्धी महामार्गाबाबत सुरु आहे, असा समज होईल, असे अहवालात म्‍हटले आहे. व्‍हॉट्सअपवर व्‍हायरल झालेल्‍या ऑडिओ क्लिपची समितीने चौकशी केली. मात्र मूळ क्लिप समितीच्‍या हाती लागली नसल्‍याची माहिती आहे.  

 

ऑडिओ क्लिप बनवणा-याला झाली होती अटक
ही ऑडिओ क्लिप बनवणा-या सतीश सखाराम मांगले याला मोपलवार यांना खंडणीसाठी धमकावल्‍याप्रकरणी ठाणे पोलिसांनी मागील महिन्‍यात अटक केली होती. ही ऑडिओ क्लिप मागे घेण्‍यासाठी मोपलवार यांच्‍याकडे त्‍याने 10 कोटी रुपयांच्‍या खंडणीची मागणी केल्‍याचा त्‍याच्‍यावर आरोप होता. मोपलवार हे मुख्‍यमंत्री यांचे निकटवर्तीय समजले जातात. यामुळे चौकशी समितीच्‍या अहवालानंतर त्‍यांना पुन्‍हा सेवेत रुजू केले जाते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर चौकशी समितीचे प्रमुख जॉनी जोसेफ यांनी सांगितले की, 'आम्‍ही सरकारला अहवाल सादर केला आहे. यावर काय कारवाई करायची याचा निर्णय सरकार घेईल.'

 

बातम्या आणखी आहेत...