आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पानसरे हत्येप्रकरणी \'सनातन’चे प्रमुख जयंत अाठवले यांची चाैकशी? तपास पथक गाेव्यामध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अंनिसचे प्रमुख डाॅ. नरेंद्र दाभाेलकर व काॅ.  गाेविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात तपास यंत्रणांच्या संशयाची सुई सनातन संस्थेकडे अाहे. याच संशयावरून ‘एसअायटी’च्या पथकाने गेल्या दाेन दिवसांत गाेव्यातील रामनाथी येथील अाश्रमात जाऊन ‘सनातन’चे प्रमुख जयंत अाठवले यांची चाैकशी केल्याचे वृत्त अाहे. सनातन संस्थेकडून मात्र त्याला अधिकृत दुजाेरा देण्यात अाला नाही.  
 
डाॅ. दाभाेलकर व काॅ. पानसरे यांच्या हत्या प्रकरणात तपास यंत्रणांनी अातापर्यंत समीर गायकवाड व  डाॅ. वीरेंद्र तावडे या सनातनच्या साधकांना अटक केली अाहे. या दाेन्ही प्रकरणांचा तपास अनुक्रमे सीबीअाय व ‘एसअायटी’मार्फत केला जात अाहे. तसेच या दाेघांच्या हत्येप्रमाणेच माेडस अाॅपरेंडी कर्नाटकातील कलबुर्गी यांच्या हत्येसाठी वापरण्यात अाल्यामुळे या तिन्ही प्रकरणांत सनातनच्या साधकांचाच सहभाग असल्याचा पाेलिसांना संशय अाहे. दरम्यान, गेल्या दाेन दिवसांत काेल्हापूर येथील विशेष तपास पथकाने गाेव्यात जाऊन जयंत अाठवले यांची चाैकशी केल्याचे वृत्त अाहे. 

मात्र, तपास पथकाने रामनाथी अाश्रमात येऊन केवळ संस्थेचे विश्वस्त डाॅ. वीरेंद्र मराठे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी दिली.  ‘दाभाेलकरांची हत्या केलेल्या पिस्तुलातील गाेळ्या बदलण्यात अाल्या याविषयी सीबीअाय तपास करत असल्याचे वृत्त अाहे. सनातनला बदनाम करण्यासाठी तपासाचा स्तर खालावत चालला असल्याचेच हे उदाहरण अाहे. जर गाेळ्या बदलल्या जाऊ शकतात तर उद्या तपास यंत्रणांच्या दबावामुळे व्यक्तीही बदलल्या जाऊ शकतात,’ असे वर्तक म्हणाले. सनातनच्या निष्पाप साधकांना पकडण्यासाठी बक्षीस लावणे हा प्रकारही हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले.
 
पवार, अकाेलकरवर पाच लाखांचे इनाम
डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्येत सहभागाचा संशय असलेले सनातन संस्थेचे फरार साधक विनय पवार (३७) व सारंग अकाेलकर (३५)  यांच्यावर सीबीअायने ५ लाख रुपयांचे इनाम जाहीर केले अाहे. दाेन्ही संशयितांची माहिती मिळाल्यास ०२२- २७५७६८२० किंवा २७५७६८०४ या क्रमांकावर किंवा hobscmum@cbi.gov.in या ई-मेलवर संपर्क साधण्याचे अावाहन प्रसिद्धिपत्रकाद्वारे करण्यात अाले अाहे. साेबत दाेघांचे फाेटाेही प्रकाशित करण्यात अाले अाहेत.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...