आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकायुक्तांनी बोलावल्यास मुख्यमंत्रीही जाणार चौकशीस; विराेधकांकडून राजीनाम्याची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- एमपी मिल प्रकरणाच्या फाइलवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न सांगताच त्यांना अवगत केल्याचा शेरा गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी मारल्याचे प्रकरण सध्या गाजत अाहे. विराेधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही हाेत अाहे.
 
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी लोकायुक्तांमार्फत करण्याचे मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात जाहीर केले होते. दरम्यान, याप्रकरणी लोकायुक्तांनी बोलावल्यास चौकशीस सामोरे जाण्यास मुख्यमंत्र्यांनी तयारी दर्शवली आहे.   

विधिमंडळात हे प्रकरण विराेधकांची चांगलेच उचलून धरले हाेेते. तेव्हा प्रकाश मेहता यांनी मला न सांगताच मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा मारला होता, असे मुख्यमंत्र्यांनीही स्पष्ट केले होते. तसेच शेराप्रकरणी  मेहता यांनीही स्पष्टीकरण दिले होते आणि त्याने समाधान झाले होते, असेही सांगितले होते. मात्र विराेधकांचे त्यावर समाधान झाले नव्हते.
 
त्यामुळे अखेर मेहतांची लाेकायुक्तांमार्फत चाैकशी लावण्यात अाली. लोकायुक्तांना मुख्यमंत्र्यांची चौकशी करण्याचे अधिकार नाहीत. मात्र मुख्यमंत्र्यांनी स्वतः चौकशीस सामोरे जाण्याची तयारी दर्शवली तर लोकायुक्त मुख्यमंत्र्यांची चौकशी करू शकतात. मुख्यमंत्र्यांनी चौकशीची तयारी दर्शवली असल्यानेच लोकायुक्त त्यांना बोलावू शकतात, अशी माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...