आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 2016: Mumbai & Maharashtra Cricket Association Moves Supreme Court

IPL चे सामने पुणे, मुंबईत हवेत- मुंबई, महाराष्ट्र क्रिकेट संघटना सुप्रीम कोर्टात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे मुंबई इंडियन्स आणि पुणे संघाचे आयपीएलचे महाराष्ट्राबाहेर हलविण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देत अखेर मुंबई व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के यांनी याला दुजोरा दिला आहे.
13 एप्रिल रोजी मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्रातील आयपीएलचे 30 एप्रिलनंतरचे सर्व सामने राज्याबाहेर हलविण्याचे आदेश दिले होते. मात्र, मुंबई व पुणे संघाला बाहेरच्या राज्यातही सामने आयोजित करण्याबाबत अडथळे येत असल्याने राज्यातील या क्रिकेट संघटनांनी हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देत सुप्रीम कोर्टात गेल्या आहेत.
मागील आठवड्यात मुंबई हायकोर्टाने दुष्काळप्रश्नी आयपीएलच्या भवितव्याबाबत झालेल्या सुनावणीत सामने राज्याबाहेर नेण्याचे आदेश बीसीसीआयला दिले होते. सामन्यांच्या आयोजनासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन हायकोर्टाने 15 दिवसांची मुदत दिली होती.
राज्यातील पाण्याची कमतरता आणि दुष्काळी परिस्थिती पाहून हायकोर्टाने हा निर्णय घेतला होता. मात्र, बीसीसीआयने इतर राज्यात सामने घेण्याची तयारी सुरु केल्यानंतर तेथेही अडचणी येऊ लागल्या. मुंबई संघाचा जयपूरमध्ये एक सामना होणार होता. मात्र, या राज्यातही दुष्काळ असताना मुंबईचे सामने जयपूरमध्येच का? इतर शहरात व राज्यात का नाही असा सवाल जयपूर हायकोर्टाने केला आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के यांनी सांगितले की, सुप्रीम कोर्ट आमचीही बाजू ऐकून घेईल व न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उन्मेष खानविलकर यांनी सांगितले की, पुणे व मुंबई संघावर व संघटनावर अन्याय होत असल्याने आम्ही दोन्ही संघटनांनी मिळून एक संयुक्त याचिका दाखल केली आहे. त्यावर सुप्रीम कोर्ट योग्य तोडगा काढेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.