आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या विजयासाठी MI ने बदलली रणनिती, रोहित सलामीला नाही खेळणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आयपीएलच्या आठव्या मोसमातील पहिले सलग तीन पराभव झाल्यानंतर विजय मिळविण्यासाठी मुंबई इंडियन्सने जोरदार तयारी केली आहे. मुंबई संघ सध्या अंकतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. आज बलाढ्य चेन्नईविरूद्ध घरच्या मैदानावरचा सामना जिंकायचाच असा निर्धार रोहित आणि मंडळींनी केला आहे. याचाच भाग म्हणून मुंबईने काही रणनिती आखली आहे. त्यानुसार रोहित शर्मा आजही सलामीला खेळणार नाही. राजस्थान रॉयल्सच्या विरूद्धच्या सामन्यात रोहित चौथ्या क्रमांकावरच खेळला होता. मात्र तो शून्यावरच बाद झाला होता. संघाचा समतोल साधण्यासाठी मी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे असे रोहित शर्माने म्हटले आहे.
मजबूत फलंदाजी गरजेची-
रोहित शर्माने सांगितले की, संघाची फलंदाजी मजबूत करण्यावर आमचा भर आहे त्यासाठी रणनिती बदलावी लागेल. संघाचा समतोल राहावा यासाठी मी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. मी आताचे बोलत आहे पुढे काय होईल मी कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करेल माहित नाही पण सध्याच्या स्थितीनुसार रणनिती आखत आहोत. संघाचा समतोल कसा साधला जातो यावर सर्वकाही अवंलबून राहील असेही रोहित शेवटी म्हणाला.
आता विजय गरजेचाच-
रोहित शर्मा म्हणाला, जेव्हा एखादा संघ मॅचेस हारतो तेव्हा तेथे नक्कीच दुरुस्तीला वाव असतो. जर आम्ही जिंकत असतो तर काही अडचण नव्हती. पण संघ अडचणीत असतो तेव्हा संघाचे संतुलन राखणे गरजेचे असते. आम्हाला पहिल्या विजयाची आस आहे. त्यामुळे संघात काही बदल करीत आहोत. रोहित शर्माने कोलकात्याविरोधात पहिल्याच सामन्यात सलामीला येऊन नाबाद 98 धावा केल्या होत्या तरीही मुंबई संघाने सामना गमावला होता.
पुढे वाचा, मुंबईच्या पराभवाबाबत कोच रिकी पॉटिंगचे काय आहे म्हणणे...
बातम्या आणखी आहेत...