आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • IPL And World Cup Security Issue Maharashtra Latest News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएल, वर्ल्डकप सुरक्षेचे 4 कोटी थकीत; गृहखात्याचे साडे नऊ कोटी रूपये अडकले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गृहखात्यातर्फे दोन-तीन वर्षांपूर्वी इंडियन प्रीमियर लिगला (आयपीएल) सुरक्षा प्रदान केली होती. परंतु अजूनही आयपीएलकडून त्याचा खर्च देण्यात आला नसल्याचे ‘कॅग’ने आपल्या अहवालात नमूद केलेले आहे. तसेच खासगी सुरक्षा घेणार्‍या व्यक्तींनीही अजूनही गृहखात्याला खर्च दिला नसल्याचेही कॅगने उघड केले आहे. आयपीएलकडून चार कोटी 39 लाख, तर खासगी व्यक्तींकडून जवळजवळ पाच कोटी रुपये येणे गृहखात्याला येणे आहे.

2008-9 ते 2012-13 दरम्यान गृहखात्यातर्फे मुंबईतील 17 खासगी व्यक्तींना पोलिस सुरक्षा देण्यात आली होती. या सुरक्षेपोटी मुंबई पोलिस कार्यालयास एक कोटी 23 लाख रुपये येणे थकीत आहे. तसेच याच कालावधीत ठाणे येथे 19 खासगी व्यक्तींना सुरक्षा प्रदान केल्यापोटी पोलिस अधीक्षक कार्यालयास चार कोटी 72 लाख रुपयांची वसुली अजूनही झालेली नसल्याचेही कॅगने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

वर्ल्डकप क्रिकेट 2011 च्या नऊ सामन्यांसाठी गृहखात्यातर्फे सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. यापोटी गृह विभागाला दोन कोटी 65 लाख रुपये येणे बाकी आहे. 2010 मध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या नागपूर येथील सामन्यासाठी
नागपूर पोलीस आयुक्त व ग्रामीण पोलिसांची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. यापोटी एक कोटी 74 लाख रुपये येणे बाकी असल्याचे कॅगने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

‘सहारा’च्या विनंतीवरून 82 लाखांची सवलत
‘आयपीएल’च्या पुण्यातील मॅचसाठी देण्यात आलेल्या सुरक्षेच्या खर्चापोटी एक कोटी 94 लाख रुपये येणे बाकी होते. मात्र पुणे फ्रँचायझी सहारा अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट कंपनीने विनंती केल्यानंतर त्यांना 82 लाखांची सवलत देण्यात आली व एक कोटी 12 लाख रुपयांची रक्कम निश्चित करण्यात आल्याने गृहखात्याचे 82 लाखांचे नुकसान झाल्याचे कॅगने अहवालात म्हटले आहे.