आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) सामन्यांमध्ये पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानपरिषदेत सांगितले. राज्यात दुष्काळाने हाहाकार माजवला असताना दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) सामन्यांबाबत पुनर्विचार करण्यास सरकार तयार नसल्याचे चित्र दिसत आहे. आयपीएलच्या निमित्ताने मुंबई आणि पुण्यातील स्टेडियमवर पाण्याची मोठ्याप्रमाणात नासाडी होत आहे.
महाराष्ट्रातील जनता विशेषत: मराठवाडा दुष्काळाने होरपळत आहे, पण दुसरीकडे मुंबई आणि पुण्यासारख्या शहरी भागात मात्र आयपीएलच्या जल्लोषाची तयारी जोरात सुरु आहे. मुंबई आणि पुण्याच्या स्टेडियम्सवर पाण्याचा अतिवापर होताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात होणार्या आयपीएलच्या सामन्यांचा पुनर्विचार व्हावा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी आयपीएलचे कमिश्नर राजीव शुक्ला यांच्याकडे केली होती. तसेच विधानपरिषदेही त्यांनी याविषयी आवाज उठवला होता.
विधानपरिषदेत विनोद तावडेंच्या या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार यांनी सांगितले की, पाण्याचा अपव्यय टाळण्याचा प्रयत्न केले जातील. परंतु सामने राज्याबाहेर हलवण्यासंदर्भात मात्र अजित पवार यांनी उत्तर देण्याचे टाळले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.