आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL & Drought: BCCI Ready To Move Nagpur, Pune\'s 5 Matches Out Of Maharashtra

IPL साठी वापरलेल्‍या पाण्‍याची तपासणी होणार, HC चे BCCI ला तीन प्रश्‍न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबर्इ उच्‍च न्‍यायालयाने आयपीएल 9 च्‍या पहिल्‍या सामन्‍यासाठी वापरलेल्‍या पाण्‍याची चौकशी करण्‍याचे आदेश दिले आहेत. मंगळवारी न्‍यायालयाने सुनावणी दरम्‍यान म्‍हटले की, ''आयपीएलच्‍या ओपनिंग सामन्‍यासाठी मैदानावर वापरलेले पाणी पिण्‍यालायक होते किंवा नाही याची फॉरेंसिक लॅबमध्‍ये तपासणी होणार आहे. तुम्‍हाला महसूलाची चिंता आहे, लोकांची नाही.'' असे कोर्टाने म्‍हटले आहे. यावर बीसीसीआयने आपले स्‍पष्‍टीकरण दिले आहे.
न्‍यायालयाचा राज्‍य शासनाला आदेश..
- न्‍यायालयाने राज्‍य शासनाला आदेश दिला की, वानखेडे स्टेडिअमवर आयपीएलच्‍या पहिल्‍या सामन्‍यासाठी वापरण्‍यात आलेल्‍या पाण्‍याची तपासणी करा व त्‍याचा अहवाल सादर करा.
- महाराष्ट्रात होणा-या आयपीएल सामन्यांसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणार असल्याची माहिती बीसीसीआयने आपली बाजू मांडताना दिली.
उच्‍च न्‍यायालयाने विचारले 3 प्रश्‍न..
- उच्‍च न्‍यायालयाने BCCI ला तीन प्रश्‍न विचारले आहेत. या तिनही प्रश्‍नांची उत्‍तरे देण्‍यासाठी बुधवारी 3 वाजेपर्यंत वेळ देण्‍यात आला आहे.
1. जेवढे पाणी आपण वापरत आहोत त्‍याची भरपाई कशी करणार?
2. पाण्‍याचा अपव्‍यय टाळण्‍यासाठी आपण काय करणार?
3. मुख्यमंत्री मदत निधीमध्‍ये आपण काही मदत देऊ शकता का?
बीसीसीआयने एक पाऊल मागे घेतले..
राज्यात भीषण पाणी टंचाई असताना दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील IPLचे सामने इतर राज्यात हलवावेत असे मुंबई हायकोर्टाने फटकारल्यानंतर बीसीसीआयने एक पाऊल मागे घेतले आहे. नागपूरात व पुण्यात होणारे काही सामने इतर राज्यात घेण्याबाबत बीसीसीआयने परवानगी दिली आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली.
- किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे नागपूरात तीन सामने होणार आहेत. मात्र, महाराष्ट्रातील दुष्काळ पाहता पंजाब संघ आता हे सामने आपल्या होम ग्राऊंड मोहालीतच घेणार असल्याचे कळते.
- पुण्यात होणारी प्लेऑफच्या महत्त्वाच्या दोन लढतीही इतरत्र हलवली जाणार असल्याचे कळते. बीसीसीआयने या बदलांना परवानगी दिल्याचे कळते आहे.
- आयपीएलचे सामने महाराष्ट्रातच होऊ द्यायचे की नाही यावर आज मुंबई हायकोर्टात एक महत्त्वाची सुनावणी झाली.
- महाराष्ट्रात आयपीएलचे एकून 19 सामने होणार आहेत. मात्र, महाराष्ट्रातील भीषण दुष्काळ पाहता काही सामने राज्याबाहेर हलविण्यास बीसीसीआयची काही हरकत नसेल अशी भूमिका बीसीसीआयने घेतली आहे.
पुण्यात प्लेऑफच्या दोन लढती..
पुण्यात प्लेऑफच्या दोन लढती होणार आहेत. त्या दोन्हीही लढती इतरत्र हलविण्याचा विचार बीसीसीआयने केला आहे. मात्र, पुणे संघाच्या इतर 7 लढती पुण्यात खेळविल्या जाणार आहेत. मुंबईतील आयपीएल सामने तेथेच होणार आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनने सर्व सामन्यांसाठी स्वत: पाणी उपलब्ध करून देणार आहोत असे म्हटले आहे. त्यामुळे मुंबईतील सामन्याबाबत फारशी अडचण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, बीसीसीआयने पिण्याचे नव्हे तर सांडपाणी व रिसायकल केलेले पाणी वापरणार असल्याचे म्हटले आहे.
पुढे वाचा, शरद पवारांची यशस्वी मध्यस्थी...कोर्टासह सरकार तोंडावर पडणार