आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटवरून पाणी पेटले! HC म्हणाले, आयपीएल सामने महाराष्ट्राबाहेरच घ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई / बारामती - महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना क्रिकेटच्या नावाखाली मैदानांसाठी सुरू असलेल्या पाण्याच्या नासाडीवरून हायकोर्टाने बीसीसीआय, महाराष्ट्र मुंबई क्रिकेट संघटनेला बुधवारी फटकारले. ‘तुमच्या दृष्टीने क्रिकेट सामने जास्त महत्त्वाचे आहेत काय, तुमचा पाणीपुरवठा बंद केला जाईल, तेव्हाच लक्षात येईल,' अशा शब्दांत फटकारले. जेथे पाणी भरपूर आहे तेथे महाराष्ट्राबाहेर आयपीएल सामने खेळवा, असे कोर्टाने सुनावले. दुसरीकडे, तहानलेल्या बारामतीत शरद पवार यांनी पाण्याची "दौलतजादा' करत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान फुलवण्याची "किमया' साधली.

सरकारची जबाबदारी : पाण्याचीनासाडी रोखण्यासाठी पावले उचलणे ही सरकारची जबाबदारी आहे, असेही हायकोर्टाने म्हटले आहे. आयपीएल सामन्यांवर होणारी पाण्याची नासाडी रोखण्यासाठी
कायपावले उचलली जात आहेत, हे सांगण्याचे निर्देश मंगळवारी उच्च न्यायालयाने सरकारला दिले होते. लोकसत्ता मूव्हमेंट या एनजीओच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने बीसीसीआयची अक्षरश: कानउघाडणीच केली. या प्रकरणाची सुनावणी गुरुवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली.
खेळपट्टीवर पाणी टाकण्यास बंदी घाला
महाराष्ट्रातील सर्व क्रिकेट संघांना मैदानावरील खेळपट्टीच्या देखभालीसाठी होत असलेली पाण्याची नासाडी थांबवण्यासाठी बंदी घालावी, अशी मागणी याचिकेत होती. त्यावर गुरुवारी विचार केला जाईल, असे न्यायालयाने सांगितले. आम्ही वानखेडे स्टेडियमवर फक्त पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करत आहोत, असे मुंबई पालिकेच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले. खेळपट्टीच्या देखभालीसाठी पाणी विकत घेतले जात आहे, असे एमसीएच्या वकिलांनी सांगितले.
वानखेडेवर ४० लाख लिटरची नासाडी: वानखेडेस्टेडियमच्या देखभालीवर किती पाणी खर्च होईल, अशी विचारणा हायकोर्टाने केली. त्यावर ४० लाख लिटर पाणी वापरले जाईल, असे एमसीएच्या वकिलांनी सांगितले. त्यावर न्यायालय म्हणाले, हे खूपच जास्त आहे.

ग्रामस्थ मात्र पाण्याला तरसलेले
{ तहानलेल्या बारामती तालुक्यातील ६१ हजारांवर लोकसंख्या सध्या ३० टँकरवर अवलंबून आहे. सध्या १९ गावे आणि २०३ वाड्या-वस्त्यांना टँकरची वाट पाहावी लागते. सध्या रोज टँकरच्या ९१ खेपा कराव्या लागत आहेत. येत्या काही दिवसांत यात वाढ होण्याची चिन्हे आहेत.
{मैदान परिसरात असलेल्या बोअरचे पाणी मैदानासाठी वापरले जाते. या गवताची हिरवाई शाबूत ठेवण्यासाठी दिवसाआड ५० हजार लिटर पाणी वापरावे लागते. भविष्यातही मैदानाचा दर्जा याच पद्धतीने कायम राखला जाईल. त्यासाठी बोअरचे पाणी वापरावे लागेल.
इकडे, बारामतीत मैदानासाठी ५० हजार लिटर पाणी...
बारामती शरद पवार यांच्या पुढाकाराने बारामतीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्यात आले आहे. पाणीटंचाई असतानाही नगर परिषदेने हे मैदान तीन महिन्यांत खेळण्यायोग्य व्हावे म्हणून संपूर्ण शक्ती पणाला लावली. या मैदानासाठी दिवसाआड तब्बल ५० हजार लिटर पाणी वापरण्यात आले. महिन्यांत १९ वेळा पवारसाहेबांनी कामाला भेट दिली, असे नगराध्यक्ष योगेश जगताप म्हणाले.

६० लाख लिटर पाण्याची नासाडी
आयपीएल सामन्यांसाठी तीन मैदानांच्या पिचच्या देखभालीवर सुमारे ६० लाख लिटर पाण्याची नासाडी होईल, असा दावा याचिकेत आहे.
तुम्ही एवढे बेजबाबदार कसे ?
तुम्ही (क्रिकेट संघ आणि बीसीसीआय) पाण्याची अशी नासाडी कशी करू शकता? तुमच्या दृष्टीने लोक जास्त महत्त्वाचे की आयपीएल? तुम्ही एवढे बेजबाबदार कसे होऊ शकता? अशा पद्धतीने पाण्याची नासाडी कोण करते? ही गुन्हेगारी नासाडी आहे. महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे, हे तुम्हाला माहीत आहे, असे न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे एम. एस. कर्णिक यांनी सुनावले.
पुढील स्लाइडमध्ये, राजीव शुक्ला काय म्हणाले...