आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद्यांनी घेतला होता या IPSचा बळी, ओळखले जायचे MR. बॉडी बिल्डर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र पोलिस दल देशातील सर्वात ताकदीचे दल म्हणून परिचित आहे. त्याचमुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कमी गुन्हेगारी आहे तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यात महाराष्ट्र पोलिस चोखपणे आपली जबाबदारी पार पाडतात. गुन्हेगारी प्रकरणांचा तपास लावण्यात महाराष्ट्र पोलिसांचा हातखंडा मानला जातो. याचबरोबर इतर क्षेत्रातही महाराष्ट्र पोलिसांनी आपले नाव रोशन केले आहे.
याच घडामोडींवर आधारित आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत 'महाराष्ट्र पोलिस दलाचे हिरो' अशा अशोक कामटे यांच्याबाबत माहिती देत आहोत. 26/11 या मुंबईवरील हल्ल्यात दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी कामटेंचा मृत्यू झाला होता. मात्र, कामटे IPS अधिकारी असले तरी त्यांची खरी ओळख होती 'MR. बॉडीबिल्डर'.

अशोक कामटे मूळचे पुण्याजवळील सासवडचे. मात्र त्यांच्या कटुंबियांचे वास्तव्य पुण्यातील पिंपळे निलख परिसरात आहे. 1989च्या IPS बॅचचे अधिकारी राहिलेले कामटे एक सर्वात यशस्वी गणले गेले आहेत. भारतीय पोलिस सेवेतील (आईपीएस) अधिका-यांपैकी सर्वात वेगळी छाप त्यांनी सोडली होती. त्यांनी अपहरण केलेल्या व दहशतवाद्यांनी ओलिस ठेवलेल्या नागरिकांना सोडविण्यासाठी खडतर प्रशिक्षण घेतले होते. त्याचमुळे मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी जेव्हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा कामटे त्यांच्यावर तुटून पडले होते. 26/11 हल्ल्यादरम्यान अशोक कामटे यांच्याकडे दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. दहशतवाद्यांशी लढताना मुंबईतील कामा हॉस्पिटलजवळ कामटे शहीद झाले होते. कामटे यांच्या पराक्रमाला अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते.

बॉडी बिल्डिंगमध्ये जिंकले होते अनेक किताब...

अशोक कामटे हे एका आयपीएस अधिका-याचा मुलगा होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना घरात व्यायामाचे बाळकडू मिळाले होते. त्यामुळे लहानपणापासून पिळदार शरीर बनविल्याने अशोक कामटेंनी महाविद्यालयीन काळात बॉडी बिल्डिंगचा छंद लागला. तो तालमीच्या आखाड्यासोबत जिममध्ये जाऊ लागले. मेहनती व व्यायमाचा छंद जडल्याने त्या काळात अशोक कामटे यांनी अनेक ठिकाणी बॉडी बिल्डिंग स्पर्धा जिंकल्या होत्या. त्याचदरम्यान अपार अभ्यास व शारीरिक कष्ट घेत IPS पोस्ट घेतली. आयपीएस अधिकारी झाल्यानंतरही त्यांनी पोलिस दलातून बॉडी बिल्डिंग स्पर्धेत यश मिळवले. पुढे यूएनचे मेडल जिंकले. त्याचमुळे अशोक कामटेंची पोलिस दलात MR. बॉडी बिल्डर म्हणून ओळखले जाऊ लागले.

पत्नी विनिताने लिहले पुस्तक- मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या अशोक कामटेंच्या पत्नी विनिता यांनी आपल्या बहाद्दुर पतीवर पुस्तक लिहले. या पुस्तकाचे नाव 'टू द लास्ट बुलेट' असे आहे. या पुस्तकात विनितानी अशोक कामटे यांचा जीवनपटच त्यात लिहला आहे. 26/11 मुंबई हल्ल्याच्या रात्री अशोक कामटेंनी आपली पत्नी विनिता व मुलांशी केलेली बातचित याची माहिती दिली आहे. त्यानंतर तासाभरात कामटे शहीद झाले होते. विनितानी लिहलेले पुस्तक वाचताना अंगावर काटे उभे राहतात.

पुढे स्लाईडच्या माध्यमातून पाहा, अशोक कामटे यांचे निवडक PHOTOS...