आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPS Officer A.k. Jain To Five Years Punishment By Mumbai Session Court

लाचखोर आयपीएस अधिकारी जैनसह सीए लोढाला पाच वर्षांचा कारावास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई सत्र न्यायालयाने निलंबित आयपीएस अधिकारी ए. के. जैन आणि त्यांचे सीए लोढा यांना बुधवारी पाच वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच दोघांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.त्यामुळे जैन आणि लोढा यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

बडतर्फ पोलिस निरीक्षक संजीव कोकीळ यांनी सन 1996 मध्ये ए.के.जैन यांच्याविरोधात लाच मागितल्याची तक्रार दाखल केली होती. जैन यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यानंती सत्र न्यायालयाने बुधवारी निकाल दिला.

जैन यांच्याविरोधात लाच मागितल्याची तक्रार दाखल केल्यानंतर अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने जैन यांना रंगेहात अटक केली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटकाही झाली होती.